Mumbai Solapur Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचीं भेट मिळणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी या दोन वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे या दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
यामुळे सर्वांचे दहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या ग्रँड इव्हेंट कडे लक्ष लागून आहे. वास्तविक पाहता ही वंदे भारत एक्सप्रेस स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. दरम्यान आता आपण या ट्रेनच्या काही विशेषता जाणून घेऊया. हाती आलेल्या माहितीनुसार या ट्रेनचा ताशी वेग 180 किलोमीटर एवढा राहणार आहे.
विशेष बाब अशी की एक्सेलरेशन 129 सेकंदात 160 किलोमीटरचा वेग पकडणार आहे. दरम्यान एवढा वेग असल्याने या ट्रेनमध्ये असं एक तंत्रज्ञान बसवण्यात आला आहे ज्यामुळे या ट्रेनचा अपघात रोखता येणार आहे. या ट्रेनमध्ये कवच नावाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही कवच यंत्रणा ट्रेनचा अपघात होऊ नये म्हणून एखाद्या ढालीप्रमाणे काम करणार आहे. या कवच यंत्रणा बाबत अधिक माहिती अशी की जर एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाड्या आल्या तर तीन किलोमीटर अगोदरच या वंदे भारत ट्रेनला समजणार आहे.
त्यामुळे आपोआप ब्रेक देखील लागले जातील. निश्चितच ही कवच यंत्रणा वंदे भारत एक्सप्रेसची विशेषता आहे. याशिवाय वंदे भारत एक्सप्रेस संपूर्ण हायटेक बनवण्यात आली आहे. एक्सप्रेसच्या सर्वचं डब्यात सीसीटीव्ही आणि इंजिन मध्ये देखील सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर रेल्वेमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर दिव्यांग व्यक्तींना देखील अगदी सहजतेने करता यावा यासाठी या ट्रेनमध्ये सोय उपलब्ध झाली आहे.
यामुळे दिव्यांगांना याचा मोठा फायदा होईल. दरम्यान आता 10 फेब्रुवारीला दोन वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन होणार आहे. यापैकी मुंबई सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस जरी गाडीचा स्पीड 160 किलोमीटर प्रति तास असला तरी देखील 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. तसेच या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र या ट्रेनमध्ये इतर सामान्य ट्रेनच्या तुलनेत अधिक सुविधा राहणार आहेत.
त्यामुळे या ट्रेनचा तिकीट दर अधिक असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ने प्रवास करण्यासाठी तिकिटाचे दर देखील जाहीर झाले आहेत. यामध्ये सोलापूर ते पुण्यापर्यंत २६२ किलोमीटरच्या अंतरासाठी ‘वंदे भारत’ला एक्झिक्युटिव्ह डब्यातील प्रवासाला एक हजार ५१० रुपयांचा तिकीट दर आहे. तर चेअर कारमधील प्रवासाला पुण्यापर्यंत ७७५ रुपये मोजावे लागतील.
याशिवाय मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-मुंबई हा ४५३ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक्झिक्युटिव्ह डब्यासाठी दोन हजार ३६५ रुपये तर चेअर कारसाठी 1 हजार 300 रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान, मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या रूट मध्ये मोठा बदल झाला आहे. नेमका रूट मध्ये बदल कसा झाला आहे आणि हा बदल केव्हापर्यंत लागू राहणार आहे हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.