Mumbai-Solapur Vande Bharat Express Latest News : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत पुणे आणि सोलापूरकरांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ही वंदे भारत पुणे मार्गे धावणार असल्याने याचा मोठा फायदा पुणेकरांना देखील होणार आहे. विशेष बाब अशी की इयत्ता 10 फेब्रुवारी रोजी या मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन नियोजित करण्यात आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने त्या अनुषंगाने संपूर्ण आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली आहे.
अशातच मात्र मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी ब्रेकिंग माहिती समोर येत आहे. वास्तविक या वंदे भारतमुळे मुंबई आणि सोलापूर दरम्यान प्रवास सुखकर होणार असल्याचा दावा केला जातो. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती लाभेल असे देखील सांगितलं जातं. विशेष बाब अशी की यामुळे ही दोन शहरे परस्परांना जवळ येणार असून कनेक्टिव्हिटी वाढण्यास आणि प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या स्पीडला ब्रेक लागणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत ट्रेनचा स्पीड आहे 180 किलोमीटर प्रति तास आहे. परंतु 10 फेब्रुवारी रोजी उद्घाटन होणाऱ्या मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस फक्त 110 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर मार्गांवरील रेल्वे ट्रॅकचा अपग्रेडिशन झाले नसल्याने ही रेल्वे आपल्या हाय स्पीड ने धावणार नाही. सध्या स्थितीला ट्रॅकचे अपग्रेडेशनचे काम सुरू आहे. यामुळे वंदे भारतचा तासी वेग खूपच कमी होणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गावरील कर्जत ते लोणावळा सेक्शनमध्ये घाट आणि ट्रॅक चढावर असल्याने त्या ठिकाणी देखील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
अशातच ट्रॅक’अपग्रेडेशनचे काम होणार नाही, तोपर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची गती वाढणार नाही म्हणजे या ट्रेनच्या स्पीडला मोठा ब्रेक लागणार आहे. विशेष बाब अशी की, ट्रॅक अपग्रेडेशन केल्यावर मात्र ही गाडी ताशी 110 किलोमीटरने धावणार नसून 130 किलोमीटर प्रति तासने गती धरणार आहे. एकंदरीत अपग्रेडेशनचे काम कंप्लिट झाल्यानंतर या ट्रेनचा स्पीड हा पिकअप घेईल आणि हे दोन शहरे वास्तविक जवळ येतील. मात्र हे काम करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.
यामध्ये स्लीपर बदलणे, रुळ बदलणे, खडी बदलणे, वळणाच्या ठिकाणी तीव्रता कमी करणे या कामाचा देखील समावेश आहे. म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात ही ट्रेन केवळ 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने भरधाव धावेल आणि ज्यावेळी या ट्रेकचा संपूर्ण काम पूर्ण होईल त्यावेळी ही ट्रेन ताशी 130 किलोमीटरने धावण्यास सक्षम बनेल असं सांगितलं जात आहे.