Mumbai Solapur Vande Bharat Express : सोलापूर जिल्ह्यासाठी अति महत्त्वाची अशी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस वे बाबत मोठी अपडेट हाती आले आहे. खरं पाहता ही एक्सप्रेस सोलापूर जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना देणारी सिद्ध होणार आहे. यामुळे सोलापूरकरांना अवघ्या साडे चार तासात राजधानी मुंबई गाठता येणार आहे.
निश्चितच कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही वंदे भारत एक्सप्रेस पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासाठी अति महत्त्वाची आहे. खरं पाहता या एक्सप्रेसचे उद्घाटन काल म्हणजे 19 जानेवारी 2023 रोजी भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे अपेक्षित होते.
उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींची पूर्तता झाली होती. मात्र ऐनवेळी या एक्सप्रेसचे उद्घाटन लांबवण्यात आले आहे. काल नरेंद्र मोदी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यावर या ट्रेनचे उद्घाटन केले नसल्याने आता या एक्सप्रेसची ओपनिंग नेमकी केव्हा होणार असा प्रश्न मुंबई समवेतच सोलापूरकरांना पडला आहे.
खरं पाहता मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनची घोषणा केली होती. या वंदे भारत एक्सप्रेस मुळे दोन्ही शहरांमधील अंतर लक्षणीय कमी होणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.
यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कृषी मालाला मुंबईची बाजारपेठ अजूनच जवळ होणार आहे. त्यामुळे पर्यटनाला मोठा भाव मिळेल असा देखील दावा केला जात आहे. दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही गाडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली होती.
अशा परिस्थितीत गुरुवारी, १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आयोजित असताना वंदे भारत सुरु होईल्, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर रंगली होती. मात्र, रेल्वेकडून या वंदे भारत एक्सप्रेसच्या ओपनिंगचे नियोजन न झाल्याने उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलल्याचे सांगितले जात आहे.
या गाडीची ओपनिंग म्हणजे उद्घाटन आता मार्चमध्ये होण्याची शक्यता असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितलं गेले आहे. निश्चितच या गाडीची वाट पाहणाऱ्यांना थोडा काळ अजून वाट पहावी लागणार आहे.