Mumbai Solapur Vande Bharat Express : फेब्रुवारी 2023 मध्ये आपल्या राज्याला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली.
ही गाडी सुरू झाली तेव्हा मध्य रेल्वेने या गाड्यांना प्रवासी चांगली पसंती दाखवतील असा आशावाद व्यक्त केला होता. वास्तविक ही गाडी सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी खरंच या गाड्यांना चांगला प्रतिसाद देखील दाखवला.
या वंदे भारत ट्रेनमुळे मुंबई-पुणे-सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणखी एक जलद पर्याय उपलब्ध झाला. परंतु सोलापूरहून थेट मुंबईला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कमी आहे आणि सोलापूरहून पुण्याला प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे.
हे पण वाचा :- काश्मीरच सफरचंद महाराष्ट्राच्या मातीत फुलल; प्रयोगशील शेतकऱ्याने फक्त 100 झाडातून कमवले दिड लाख, वाचा….
आता सोलापूरहुन पुण्याकडे जाण्यासाठी इतर एक्सप्रेस देखील प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. हुतात्मा एक्सप्रेस देखील आहे. शिवाय हुतात्मा एक्सप्रेसचे तिकीट दर हे वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर अर्ध्या तासांच्या फरकानंच हुतात्मा एक्स्प्रेस ही सोलापूरहून पुण्यासाठी सुटते.
यामुळे प्रवासी अर्ध्या तासांच्या फरकाने हुतात्मा एक्सप्रेसने पुण्याला पोहोचतात. यामुळे तिकीट दर कमी असल्याने वर्षांच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस ऐवजी हुतात्मा एक्सप्रेसला अधिक पसंती दाखवली जात आहे. हेच कारण आहे की मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवासी संख्या दोन महिन्यातच कमी झाली आहे.
प्रवाशांनी आता या गाडीकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. या गाडीमुळे मध्य रेल्वे ला 56.3%च कमाई झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 11 फेब्रुवारी 2023 ते 25 एप्रिल 2023 या कालावधीमधील 64 फेऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
या काळात चेअर कार आणि एक्सिक्युटिव्ह कार यांच्यात अनुक्रमे 65536 आणि 6656 असे 72192 प्रवाशांनी बुकिंग केले. यानुसार रेल्वेला या गाडीतून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे महागडे तिकीट पाहता या गाडीला प्रवाशांची पसंती लाभत नसल्याचे सांगितलं जात आहे.