Mumbai Solapur Vande Bharat Express : फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गावर सुरू झालेल्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांच्या माध्यमातून मोठी पसंती मिळाली आहे.
विशेषतः मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. या ट्रेनमुळे मुंबईकरांचा पुणे आणि सोलापूरकडील प्रवास गतिमान झाला आहे तर पुणेकरांचा मुंबई आणि सोलापूरचा प्रवास वेगवान झाला आहे. दरम्यान आता या ट्रेन बाबत मोठी धक्कादायक माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेन वर गेल्या आठवड्यात दोनदा दगडफेक झाली आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसनंतर आणखी एक मोठी भेट ! ‘या’ दिवशी धावणार भारत गौरव ट्रेन, ट्रेनचा रूट कसा असणार वाचा इथं
त्यामुळे या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दगडफेकीत प्रवाशांना कोणतीच हानी झालेली नाही मात्र रेल्वेचे काच फुटले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या ट्रेन वर पुणे विभागात गुरुवारी लोणावळा जवळ आणि शनिवारी हडपसर जवळ दगडफेक झाली आहे.
यामुळे निश्चितच वंदे भारत एक्सप्रेस वर होणाऱ्या दगडफेकीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे जरुरीचे बनले आहे. विशेष म्हणजे या ट्रेन वर दगडफेक झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील पुणे विभागात रेल्वेवर दगडफेक झाली आहे. यामुळे रेल्वेवर होणारी दगडफेक चिंतेचा विषय बनली आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा ‘हा’ महत्त्वाचा प्रकल्प अडचणीत; न्यायालयाने दिलेत ‘हे’ महत्त्वाचे आदेश, वाचा सविस्तर
पुणे विभागात कोणत्या ठिकाणी होते दगडफेक?
पुणे लोणावळा तसेच पुणे दौंड मार्गावर दगडफेक प्रामुख्याने पाहायला मिळते. लोणावळा मार्गावर तळेगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, आकुर्डी आणि शिवाजीनगर या भागात प्रामुख्याने दगडफेक होते. तसेच दौंड मार्गावर घोरपडी, लोणी, मांजरी, उरुळी, यवत आणि कऱ्हाड या भागात आत्तापर्यंत दगडफेकीच्या घटना झाल्या आहेत.
दरम्यान दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफ जवानांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जवानांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. शिवाय दगडफेकीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा देखील उगारला जात आहे.
हे पण वाचा :- राज्य शासनाचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना आता ‘या’ बाबीसाठी मिळणार 2 लाखाचं अनुदान ! वाचा सविस्तर