Mumbai-Solapur Vande Bharat Express : महाराष्ट्राला लवकरच दोन वंदे भारत एक्सप्रेसचीं भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमातून दिली जाणार आहे. खरं पाहता वंदे भारत ट्रेन ही नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात मुंबई-सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनचे 10 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करणार आहेत.
10 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता मध्य रेल्वेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या ट्रेनचा लोकार्पण सोहळा आयोजित झाला आहे. अशातच मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्याची आग्रही मागणी धरली आहे.
खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान खासदार महोदय यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस च्या मुंबईहून प्रस्थान करण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही वंदे भारत एक्सप्रेस गाडी सोलापूरहुन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी निघेल आणि नऊ वाजता पुण्यात पोहोचेल. तसेच दुपारी बारा वाजून 35 मिनिटांनी ही ट्रेन मुंबईला पोहोचणार आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणाहुन सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ही ट्रेन निघणार असून पुण्याला सात वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल आणि पुन्हा सोलापूरला रात्री 10:40 ला पोहोचणार आहे. मात्र आता खासदार महोदय यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणाहून ही रेल्वे सहा वाजता सोलापूर कडे रवाना झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.
खासदार महोदय यांच्या मते रेल्वेच्या टाईमिंग मध्ये बदल झाल्यास म्हणजे ही ट्रेन चार वाजता मुंबईहून न सोडता सहा वाजता सोडली तर सकाळी सोलापूरहून आलेल्या व्यापारी व इतर लोकांना मुंबईतील त्यांची कामे उरकून संध्याकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होता येईल.
विशेष बाब अशी की केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महोदय यांच्या या मागणीवर सकारात्मकता दर्शवली आहे. यामुळे आता सोलापूर वासियांसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री या ट्रेनच्या टाइमिंग मध्ये बदल करतात का याकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाचे दर झालेत जाहीर