Mumbai Solapur Vande Bharat Express : नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच एक एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 11 व्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली. भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान अकरावी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात देशात नववी आणि दहावी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे.
मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या रूट वर वंदे भारत गाडी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही ट्रेनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभत असून प्रवाशांची यां ट्रेन बाबत काही मागणी देखील आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण या ठिकाणी थांबा देण्याची प्रवाशांची मागणी आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त बदलला, आता ‘या’ महिन्यात होणार उद्घाटन, पहा…..
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई शिर्डी वंदे भारतला कल्याणला थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबई सोलापूरला कल्याण या ठिकाणी थांबा देण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत या गाडीला देखील कल्याणला थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांनी गेल्या काही दिवसांपासून लावून धरली आहे.
अशातच आता केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. कपिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण या ठिकाणी थांबा मिळावा यासाठी ते गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तसेच रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी खुशखबर ; ‘या’ बहुचर्चित पुलाचे ‘या’ तारखेला होणार उदघाट्न, पहा डिटेल्स
त्यांच्या या पाठपुराव्याला आता यश आले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण या ठिकाणी लवकरच मुंबई-सोलापूर वंदे एक्सप्रेसला थांबा दिला जाणार आहे. निश्चितच मंत्री महोदय यांच्या पाठपुराव्याला जर यश आले आणि कल्याण या ठिकाणी या गाडीला जर थांबा मिळाला तर कल्याणसह आजूबाजूच्या परिसरातील नवे-नवे तर ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
वास्तविक, कपिल पाटील गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी करत होते, प्रवाशांकडून देखील यासाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर आता या मागणीवर रेल्वे प्रशासनाकडून तसेच रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली आहे यामुळे प्रवाशांची मागणी मान्य होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी सोने पे सुहागा ! आता मुंबई आणि नवी मुंबईमधला ‘हा’ भाग मेट्रो मार्गाने जोडला जाणार, पहा कसा असेल रूटमॅप