Mumbai Solapur Ticket Booking : सध्या महाराष्ट्राचा संपूर्ण देशभरात वंदे भारत ट्रेनच्या मोठ्या चर्चा रंगत आहेत. वास्तविक ही ट्रेन भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलू पाहत आहे. ही ट्रेन आपल्या जलद प्रवासासाठी आणि सुरक्षित तसेच आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांमध्ये कमी वेळेतच अधिक लोकप्रिय झाली आहे.
लोकांना वंदे भारत एक्सप्रेस बाबत जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला देशात एकूण अकरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. यापैकी अकरावी वंदे भारत एक्सप्रेस एक एप्रिल 2023 रोजी देश दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या करकमलाद्वारे सुरु करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- एकदाच ठरलं बाबा….! ‘या’ दिवशी मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचे उदघाट्न होणार, पहा….
काल या अकराव्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला असून 15 ऑगस्ट पर्यंत देशभरात 75 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मुंबई ते गोवा आणि पुणे ते सिकंदराबाद या रूट वर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या माध्यमातून समोर येत आहे. सध्या महाराष्ट्रात चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून या दोन वंदे भारतची आणखी भर यामध्ये पडणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या राज्यात मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी, मुंबई-गांधीनगर आणि नागपूर-बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस अविरतपणे सुरू आहेत. दरम्यान आज आपण वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट कशा पद्धतीने बुक केले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ बन दवडता जाणून घेऊया वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट बुकिंग बाबत सविस्तर माहिती अगदी थोडक्यात.
हे पण वाचा :- मच्छिंद्रभाऊ मानलं! कांद्याच्या आगारात फुलवली केळीची शेती, झाली लाखोंची कमाई बनले लखपती
वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट कसे बुक करायचे
- जर आपणास वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करायचा असेल आणि तिकीट बुक कसे करायचे हे माहीत नसेल तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल एप्लीकेशनच्या मदतीने आपण या ट्रेनचे तिकीट बुक करू शकणार आहात.
- रेल्वेचे अधिकृत वेबसाईट किंवा एप्लीकेशन ला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी “ट्रेन्स” पर्यायावर क्लिक करा आणि ट्रेनच्या सूचीमधून “Vande Bharat Express” हा पर्याय आपल्याला तिकीट बुकिंग साठी निवडावा लागेल.
- यानंतर तुमच्या प्रवासाच्या तारखेसह तुमचे स्रोत आणि गंतव्य स्थाने निवडा.
- मग प्रवासाचा वर्ग आणि प्रवाशांची संख्या आपणास निवडावी लागणार आहे.
- त्यानंतर मग उपलब्ध गाड्या आणि त्यांच्या वेळा पाहण्यासाठी “गाड्या शोधा” या बटणावर क्लिक करावे लागेल.
- इच्छित ट्रेन निवडा आणि जागांची उपलब्धता तपासा.
- प्रवाशांचे तपशील एंटर करा आणि तुमचे तिकीट बुक करण्यासाठी पेमेंट करा.
- याशिवाय आपण भारतीय रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत तिकीट बुकिंग एजंटद्वारे किंवा कोणत्याही रेल्वे आरक्षण काउंटरवर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट बुक करू शकणार आहात.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी खुशखबर ! अखेर मुहूर्त लागला; ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग 15 एप्रिलला होणार सुरू