Mumbai Solapur Railway : मुंबई, सोलापूरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषतः मुंबई ते सोलापूर दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी खास राहणार आहे.
खरंतर ही बातमी फक्त मुंबई आणि सोलापूरपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी खास आहे असे नाही तर ही बातमी मुंबईहून तिरुपतीला आणि सोलापूरहून तिरुपतीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील खास आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते वेलकन्नी पर्यंत एक साप्ताहिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता ही नवी साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सोलापूर मार्गे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे या गाडीला सोलापूरला थांबा दिला जाणार आहे.यामुळे सोलापूर मधील तिरुपतीला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखी गतिमान होणार असून त्यांना भगवान तिरुपतीचे दर्शन सहजतेने घेता येणार आहे. निश्चितच ही तिरुपती बालाजी भगवानच्या भाविक भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राहणार आहे.
केव्हा धावणार ही गाडी ?
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे. ही गाडी या मार्गावर आठवड्यातून शनिवारी आणि सोमवारी धावणार आहे. मुंबई ते तिरुपती दरम्यान ही गाडी शनिवारी धावणार आहे आणि तिरुपतीहून मुंबई दरम्यान गाडी सोमवारी धावणार अशी माहिती समोर आली आहे.
एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, दर शनिवारी दुपारी एक वाजता मुंबईहून ही गाडी रवाना होणार आहे. पुण्यात दुपारी चार वाजून 55 मिनिटांनी पोहचणार आहे.
तर, सोलापूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी पोहोचणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निश्चितच या साप्ताहिक गाडीमुळे सोलापूरकरांचा तिरुपतीचा प्रवास आणखी जलद आणि सोयीचा होणार आहे.