Mumbai Shirdi Vande Bharat Train : आज मुंबई शिर्डी मध्ये भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही एक्सप्रेस मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची पर्वणी राहणार आहे. दरम्यान आता या वंदे भारत ट्रेन बाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे.
खरं पाहता मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला आता कसारा आणि आसनगाव स्थानकावर थांबा मिळावा अशी मागणी केली गेली आहे. विशेष म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहापूर उपतालुकाप्रमुख भरत उबाळे यांनी ही मागणी केली आहे. भरत उबाळे यांनी या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
शहापूर, भिवंडी, वाडा, मुरबाड, वसई, मोखाडा भागातील अनेक भाविक नियमित शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जातात. मात्र सद्यस्थितीला या भागातील प्रवाशांना रेल्वे मार्गाने किंवा खाजगी वाहनाच्या मदतीने शिर्डीला जावे लागत आहे. यामुळे साई भक्तांना अधिकचा फेरा पडतो तसेच खर्च देखील यामुळे अधिक लागतो. यामुळे वेळही वाया जातो.
मात्र जर या दोन स्थानकावर थांबे मिळाले तर या परिसरातील साई भक्तांना एका दिवसात शिर्डीहून दर्शन घेऊन परतणे शक्य होणार असल्याचे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेसला दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड येथे या वंदे भारत एक्सप्रेसला थांबे देण्यात आले आहेत.
मात्र आता ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या आसनगाव आणि कसारा या स्थानकावर देखील या वंदे भारत एक्सप्रेसला थांबे मिळावेत अशी मागणी शिंदे गटाचे उपतालुकाप्रमुख भरत उबाळे यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. उबाळे यांची ही मागणी मान्य झाल्यास जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, पडघा तसेच पालघर जिल्ह्यातील वसई, वाडा, मोखाडा आणि इतर भागातील भाविकांना या एक्सप्रेसच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
याबाबत मात्र रेल्वे अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता हा रेल्वे प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय असून वरिष्ठ पातळीवर या विषयी निर्णय हे होत असतात. निश्चितच, उबाळे यांची ही मागणी मान्य झाली तर प्रवाशांना फायदा होणार आहे. दरम्यान मुंबई शिर्डी एक्सप्रेसच्या रूट बाबत आणि वेळापत्रक अन तिकीट दराबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.