Mumbai-Shirdi Vande Bharat Express : 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या रेल्वेमध्ये दोन वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या रूटवर या दोन ट्रेन धावणार आहेत. यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस मुळे मुंबई, नाशिक, शिर्डी ही शहरे लोहमार्गाने जोडली जाणार आहेत.
विशेष बाब अशी की या वंदे भारत ट्रेन मुळे सध्या स्थितीला जी रस्ते मार्गाने वाहतूक कोंडी होत आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे साई भक्तांना शिर्डीला सोयीची कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई ते नाशिक आणि नासिक ते शिर्डी एकाच दिवसात कव्हर होणार असल्याचा दावा केला जातो.
म्हणजे आता राजधानी मुंबईमधील साई भक्तांना वनडे मध्ये साई दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीतून मुंबईकरांना शिर्डीला दर्शनासाठी यायचे असल्यास मुंबई ते इगतपुरी तेथून पांढुर्ली मार्गे सिन्नर आणि सिन्नरहून शिर्डी असा प्रवास करावा लागतो. एका अंदाजानुसार किमान 350 किलोमीटर एका बाजूने रस्त्याने मुंबईकरांना शिर्डी गाठावी लागत होती.
म्हणजेच हा दोन्ही बाजूचा प्रवास 700 किलोमीटर लांबीचा बनतो. त्यामुळे साई भक्तांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवासात अधिक वेळ खर्च होतो. परंतु आता या ट्रेनमुळे वेळेची बचत होणार आहे. वंदे भारत ट्रेन ने मुंबईहून शिर्डी प्रवास केल्यास 343 किलोमीटरचे अंतर राहणार आहे. खरं पाहता शिर्डी जाण्यासाठी सद्यस्थितीला थेट ट्रेन उपलब्ध नसल्याने बाय रोड प्रवास हा चालू आहे.
त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते आणि परिणामी अपघातांची संख्या देखील अलीकडील काही काळात वाढले आहे. मात्र आता या वंदे भारत ट्रेनमुळे निश्चितच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. 10 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन साईभक्तांसाठी यामुळेच आनंदाची पर्वणी राहणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सीएसएमटी-शिर्डी या ट्रेनला दादर, ठाणे, नाशिक रोड, मनमाड असे थांबे राहणार आहेत.
या गाडीच्या वेळापत्रकाबद्दल जर बोलायचं झालं तर ही गाडी सकाळी 6:00 वाजता (6 AM) सीएसएमटीवरून निघेल व साडेअकरा वाजता शिर्डीला पोहचणार आहे. तसेच ही गाडी शिर्डीहून पाच वाजता (5 PM) निघणार आहे आणि रात्री अकरा वाजता (11 PM) सीएसएमटीला पोहचणार आहे.
मुंबईकरांसाठी निश्चितच ही गाडी आनंदाची पर्वणी राहणार आहे शिवाय नाशिकवासीयांनाही या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान या बहुचर्चेत वंदे भारत एक्सप्रेस ने मुंबई ते शिर्डी प्रवास करण्यासाठी किती तिकीट लागेल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वंदे भारत एक्सप्रेस : मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस तिकिटाचे दर झालेत जाहीर