Mumbai Railway : सध्या देशात एका ट्रेनची मोठी चर्चा होत आहे ती म्हणजे वंदे भारत ट्रेन. संपूर्ण भारतीय बनावटीची, मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली ही ट्रेन देशात सध्या स्थितीला दहा मार्गांवर धावत असून यापैकी चार मार्ग महाराष्ट्रातील आहेत.
राज्यात सध्या स्थितीला मुंबई सोलापूर, मुंबई शिर्डी, मुंबई गांधीनगर, आणि नागपूर बिलासपूर या मार्गावर वंदे भारत धावत आहेत. यापैकी दोन ट्रेन म्हणजे सीएसएमटी-साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर गेल्या महिन्यातच रेल्वेच्या ताफ्यात आल्या आहेत.
नव्याने सामील झालेल्या या दोन्ही मार्गावरील ट्रेनला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. हेच कारण आहे की आता या ट्रेनचा विस्तार केला जात आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर कोच मध्ये देखील तयार केल्या जाणार आहेत. एवढेच नाही तर आता मेट्रो ट्रेन देखील वंदे भारत मेट्रो राहणार आहेत. अशातच रेल्वे बोर्डाकडून मुंबईकरांना आणखी एक भेट मिळणार आहे.
आता मुंबई व उपनगरात वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे भारत लोकल सुरू होणार आहेत. निश्चितच मुंबईकरांना रेल्वे बोर्डकडून मिळणारी ही एक प्रकारची भेटच राहणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मुंबई शहरात वंदे लोकल सुरू होऊ शकते. निश्चितच पुढल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता शासनाकडून वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत.
त्यामुळे वंदे लोकल देखील त्यापूर्वीच सुरू होण्याची दाट शक्यता तज्ञांकडून तसेच जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे. वंदे लोकल ही वंदे भारत एक्सप्रेस ची एक छोटी आवृत्ती राहणार आहे. यामुळे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येणे शक्य होणार आहे. मुंबई लोकल जर सुरू झाली तर यामुळे प्रवाशांना जलद गतीने शहरादरम्यान प्रवास करता येणे शक्य होणार आहे. वास्तविक रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
यामुळे वंदे लोकलला देखील चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी या संदर्भात मोठे अपडेट दिली आहे. गोयल यांनी सांगितले की, रेल्वे बोर्ड मुंबई शहरात वंदे भारत सारख्या लोकल गाड्या सुरू करण्याचा विचार करत आहे. यासाठी शक्यतांची चाचपणी आतापासूनच सुरू झाली आहे. निश्चितच लोकलला मुंबईची लाईफ लाईन किंवा जीवनवाहिनी म्हणून संबोधलं जातं.
अशा परिस्थितीत वंदे भारत प्रमाणे लोकल जर सुरु झाली तर मुंबईच्या जीवनवाहिनीला नवीन स्वरूप प्राप्त होईल, यामुळे प्रवास जलद होईल, शिवाय अशा प्रकारच्या लोकलमुळे प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल, आरामदायी प्रवास यामुळे प्रवाशांना करता येणे शक्य होईल.
तूर्तास मुंबईमध्ये वंदे लोकल केव्हा सुरू होतील याबाबत संबंधितांकडून माहिती देण्यात आलेली नाही, पण लोकसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारच्या लोकल शहरात धावतील असा अंदाज बांधला जात आहे.
हे पण वाचा :- आता राजधानी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार वंदे भारत ट्रेन ?