Mumbai Railway News : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेकजण आपल्या मूळ गावी परतत असतात. सुट्ट्यांच्या कालावधीत अनेकजण पिकनिकचा प्लॅन बनवतात. तसेच उन्हाळी हंगामात लग्नकार्य देखील असते. यामुळे दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की रेल्वे प्रवाशांची संख्या वाढते. या काळात विविध रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या गाड्या हाउसफुल असतात.
मात्र प्रवाशांची वाढलेली ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन उन्हाळी हंगामात दरवर्षी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवते. या उन्हाळी विशेष गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास जलद होतो आणि अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवता येते.
यंदा देखील उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत.
दरम्यान या गाड्यांमुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अशीच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि यादरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी त्रि-साप्ताहिक वातानुकूलित राहणार आहे.
म्हणजे ही गाडी एका आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवि या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या 18 आणि थिवि ते एलटीटी या विशेष एक्सप्रेसच्या 18 अशा एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.
त्यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना आणि कोकणातून मुंबईला येणाऱ्यांना या गाडीचा फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एल टी टी ते थिवी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१०१७) 26 एप्रिल ते 4 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही गाडी या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि रविवारी २२.१५ वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ०९.५० वाजता थिवि येथे पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१०१८ ही वातानुकूलित विशेष गाडी 27 एप्रिल ते पाच जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी थिवि येथून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी १६.३५ वाजता सुटणार आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचणार आहे.
कुठं थांबणार ही विशेष गाडी
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार अशी माहिती समोर आली आहे.