Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधून धावणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
खरे तर मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ ते मुंबई दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले होते. भुसावळ ते मुंबई सेंट्रल दरम्यान ही गाडी चालवली जाणार होती.
दरम्यान भुसावळ ते मुंबई सेंट्रल विशेष एक्सप्रेस ट्रेन 28 फेब्रुवारी पर्यंत आणि मुंबई सेंट्रल ते भुसावळ विशेष एक्सप्रेस ट्रेन 27 फेब्रुवारी पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या मार्गावर प्रवाशांची वाढलेली गर्दी अजूनही कमी झालेली नाही. या मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे.
अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने या मार्गावर सुरू करण्यात आलेल्या या त्रि-सप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे भुसावळहुन मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहुन खानदेशकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या मध्य रेल्वेच्या निर्णयाचा मोठा फायदा होणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
आता आपण या त्रिसप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनला किती दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत ही गाडी सुरू राहणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्रि-साप्ताहिक विशेष ट्रेनला किती दिवसांची मुदत वाढ
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथून सुटणारी गाडी (०९०५२) भुसावळ -मुंबई सेंट्रल त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही २८ फेब्रुवारीनंतरही सुरू राहणार आहे. ही गाडी आता १ मे पर्यंत चालवली जाणार सेंट्रल रेल्वेने स्पष्ट केले आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१०५१ अर्थात मुंबई सेंट्रल- भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष गाडी ही २७ फेब्रुवारीनंतर सुद्धा चालवण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
यानुसार आता ही गाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार अशी माहिती मध्य रेल्वे कडून समोर आली आहे.