Mumbai Railway News : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढत आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आर्थिक राजधानी मुंबईमधून उत्तर भारताकडे मोठ्या प्रमाणात प्रवासी रवाना होत आहेत. यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने राजधानी मुंबईवरून उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मुंबई ते गोरखपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
ही गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडल्या जाणार आहेत. यामुळे मुंबई येथील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे. प्रामुख्याने मुंबई येथे वास्तव्याला असलेल्या उत्तर भारतामधील जनतेला या गाडीचा फायदा होणार आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण या विशेष एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या गाड्यांचे वेळापत्रक कसे आहे ?
कसं राहणार वेळापत्रक
01083 LTT-गोरखपूर विशेष ट्रेन LTT येथून 20 एप्रिल रोजी 23:50 वाजता सुटेल आणि 3ऱ्या दिवशी 09:30 वाजता गोरखपूरला पोहोचेल. 01084 विशेष ट्रेन 22 एप्रिल रोजी गोरखपूर येथून 15.30 वाजता सुटेल आणि एलटीटी मुंबईला तिसऱ्या दिवशी 00.25 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०१०८५ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०१०८६ विशेष गाडी मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल.
कोणत्या स्थानकावर थांबणार ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून गोरखपूरला जाणारी ट्रेन ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती स्थानकावर थांबा घेणार आहे. तथापि, थांब्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.