Mumbai Railway News : येत्या काही दिवसात महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर पासून यंदा गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
दरम्यान सालाबादाप्रमाणे मुंबई येथे स्थायिक झालेले कोकणातील चाकरमाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी गणपती विशेष गाड्या देखील चालवल्या जात आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अनेक विशेष गाड्या गणेशोत्सवाच्या काळात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशातच कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईहून चालवल्या जाणाऱ्या तीन विशेष गाड्यांना कोकण रेल्वेने नवीन थांबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोणत्या गाडीला मिळाला नवीन थांबा ?
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी जवळपास कोकण रेल्वे मार्गावर 248 गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, या विशेष गाड्यांपैकी एक एक्सप्रेस गाडीला आणि दोन मेमू गाड्यांना नवीन थांबा देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या गणपती विशेष एक्सप्रेस गाडीला पेण या नवीन रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. याशिवाय दिवा ते रत्नागिरी आणि दिवा ते चिपळूण दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष मेमू ट्रेनला देखील पेण या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
या तिन्ही गाड्यांना 14 सप्टेंबर पासून ते 3 ऑक्टोबर पर्यंत पेण या नवीन रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच या निर्णयाचा कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.