Mumbai Railway News : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईहून धावणाऱ्या तीन विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई-जयपूर, मुंबई-अजमेर आणि मुंबई-बिकानेर या तीन विशेष एक्सप्रेस गाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे.
परिणामी मुंबईहून राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर सध्या उन्हाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. याशिवाय सणासुदीचा देखील हंगाम सूरु आहे. लोकसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजला आहे.
अशा परिस्थितीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पर्यटक तसेच सणासुदीला मुंबईमध्ये स्थायिक झालेले राजस्थान येथील नागरिक आपल्या गावाकडे परतणार आहेत. अशा परिस्थितीत या विशेष एक्सप्रेस गाड्यांना मिळालेली मुदतवाढ या प्रवाशांसाठी विशेष फायद्याची ठरणार आहे.
यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. दरम्यान आता आपण या तीन विशेष गाड्यांना कधीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कधीपर्यंत मिळाली मुदतवाढ
हाती आलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९७२४ वांद्रे टर्मिनस-जयपूर, (०४७११/२) वांद्रे टर्मिनस-बिकानेर साप्ताहिक २८ मार्चपर्यंत धावणार होती. पण आगामी काळात या मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर ही गाडी आता २७ जूनपर्यंत चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच गाडी क्रमांक ०९७२३ जयपूर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष २६ जून आणि (०९६२२) वांद्रे टर्मिनस-अजमेर साप्ताहिक विशेष एक जुलैपर्यंत धावणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.
शिवाय, गाडी क्रमांक ०९६२१ अजमेर-वांद्रे टर्मिनस साप्ताहिक ३० जूनपर्यंत धावणार आहे. यामुळे साहजिकच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आणि यंदा देखील तशीच गर्दी राहणार आहे.
हेच कारण आहे की या विशेष गाड्यांना मुदतवाढ मिळाली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. दरम्यान रेल्वे देखील असाच विचार करत होते आणि अखेर कार प्रवाशांचे हित लक्षात घेता पश्चिम रेल्वे प्रशासनाने या तीन विशेष गाड्यांना मुदतवाढ दिलेली आहे.