Mumbai Railway News : राज्यासह संपूर्ण देशभरात प्रवासासाठी रेल्वेला विशेष पसंती दाखवली जाते. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी नागरिक रेल्वेचाच पर्याय निवडतात. रेल्वेने प्रवास करण्याची खरे तर अनेक कारणे आहेत.
रेल्वेने प्रवास करण्याचे प्रमुख कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास खूपच किफायतशीर आहे, शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे संपूर्ण देशात पसरलेले आहे यामुळे देशातील कोणत्याही भागात जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध होते.
यामुळे नेहमीच रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे शहरातून धावणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी अर्थातच एक डिसेंबर 2023 रोजी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागात देखभालीच्या कामाकरिता हा ब्लॉक घेतला जाणार आहे.
उद्या सकाळी साडेआठ ते अकरा या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र या ब्लॉकमुळे या मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
आता आपण या ब्लॉकमुळे कोणत्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
कोकण रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, या ब्लॉकमुळे एक डिसेंबर रोजी धावणारी सावंतवाडी रोड ते दिवा एक्सप्रेस (गाडी क्रमांक 10106) ही गाडी सावंतवाडी रोड ते कणकवली या दरम्यान तीस मिनिट उशिराने धावणार आहे.
याशिवाय मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान एक डिसेंबरला धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर दहा मिनिटे थांबवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे रेल्वे प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. पण यामुळे कोणतीच एक्सप्रेस गाडी रद्द होणार नाही.