Mumbai Railway News : मुंबई आणि गोवा भारतातील दोन प्रमुख पर्यटन स्थळ आहेत. या दोन्ही शहरादरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. सुट्टीच्या दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढत असते. सणासुदीच्या काळात आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते.
यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास सुसाट होणार आहे. खरे तर या मार्गावर सध्या ज्या गाड्या सुरू आहेत त्या अपुऱ्या पडत आहेत.
सध्याच्या सर्वच गाड्या हाउसफुल धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित केली जात आहे. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने नुकताच एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
21 ऑगस्टला हा प्रस्ताव पाठवला गेला असून या प्रस्तावात वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्यासाठी परवानगी मागितली गेली आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाऊ शकते.
या गाडीचा प्रस्ताव आणि आराखडा कोकण रेल्वेने रेडी केला असून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. परंतु अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये. तथापि, सूत्रांकडून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल झाला असल्याचे समजतं आहे.
पण, याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मंजुरीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, आज आपण कोकण रेल्वेने पाठवलेल्या प्रस्तावानुसार या गाडीचे वेळापत्रक कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
मीडिया रिपोर्टनुसार, ही नवीन गाडी द्विसाप्ताहिक राहणार आहे. अर्थातच ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार असेल. मडगाव-वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 7.40 वाजता मडगाव येथून सोडली जाणार आहे आणि वांद्रे येथे रात्री 23.40 वाजता पोहोचणार आहे.
तसेच वांद्रे- मडगाव एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून बुधवारी आणि शुक्रवारी पहाटे 6.50 वाजता सुटणार आहे आणि मडगाव येथे रात्री 22.00 वाजता पोहोचणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात अजून कोणतीच माहिती हाती आलेली नाही. पण, सध्या गाडीचे जसे वेळापत्रक आहे ते पाहता ही ट्रेन दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ज्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत आहे त्या रेल्वे स्थानकावर थांबू शकते असा दावा केला जात आहे.