Mumbai Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे फेस्टिव सीझनमध्ये अर्थात सणासुदीच्या दिवसात ही संख्या आणखी वधारत असते. दरवर्षी ऑगस्ट महिन्यापासून फेस्टिव सीजन ला सुरुवात होत असते. यंदाही फेस्टिव सिझनला सुरुवात झाली आहे.
आगामी काळात अनेक छोटे मोठे सण साजरे होणार आहेत. यामुळे आगामी काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरम्यान हीच अतिरिक्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आता मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेने देखील रेल्वे प्रवाशांची संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुंबईहून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गर्दीच्या कालावधीत या विशेष एक्सप्रेस ट्रेनचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे.
वांद्रे टर्मिनस ते वेलंकनी यादरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरु होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही गाडी पुणे, सोलापूर मार्गे धावणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक?
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस – वेलंकनी स्पेशल (गाडी क्रमांक 09093 ) ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून 27 ऑगस्ट म्हणजे मंगळवारी आणि 6 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी 21.20 वाजता सोडली जाणार आहे. तसेच ही गाडी अनुक्रमे गुरुवारी म्हणजेच 29 ऑगस्टला आणि रविवारी म्हणजेच 8 सप्टेंबरला 08.30 वाजता वेलंकन्नीला पोहोचणार आहे.
याशिवाय ट्रेन क्रमांक 09094 म्हणजे वेलंकनी – वांद्रे टर्मिनस स्पेशल गाडी वेलंकनी रेल्वे स्टेशनवरून गुरुवारी अर्थातच 29 ऑगस्टला आणि रविवारी अर्थातच 8 सप्टेंबरला 22.00 वाजता सोडली जाणार आहे आणि अनुक्रमे शनिवारी आणि मंगळवारी 15.00 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला. बोरिवली, वसई रोड, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, गुंटकल, कडप्पा, रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर कँट, तिरुवन्नमलाई, विल्लुपुरम, कुड्डालोर पोर्ट, चिदंबरम, सिरकाझी, मायिलादुथुराई, तिरुवरूर आणि नागपट्टिनम या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन थांबा घेणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.