Mumbai Railway News : तुम्ही मुंबईकर असाल आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गोव्याला जाण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पश्चिम मध्य रेल्वेने नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सेलिब्रेट करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या नागरिकांकरिता विशेष ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.
दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक गोव्याला जातात. नववर्षाच्या स्वागताला गोव्याला जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक गोव्याला नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळ सणाच्या सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी जातात.
यामुळे दरवर्षी या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या मार्गावर सुरू असणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरशा तिकीट मिळत नाही. हीच गोष्ट विचारात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम मध्ये रेल्वेने मध्यप्रदेशातील रीवा ते गोव्यातील मडगाव दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला असून ही गाडी आपल्या मुंबई मार्गे जाणार आहे.
त्यामुळे मुंबईकरांना देखील जलद गतीने गोव्याला पोहोचता येणार असून या गाडीचा मध्यप्रदेश सहित महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी नेमकी कुठे कुठे थांबणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
पश्चिम मध्ये रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रीवा-मडगाव विशेष ट्रेन 22 डिसेंबर आणि 29 डिसेंबरला दुपारी 12:00 वाजता रीवा येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री 09:25 वाजता मडगाव स्थानकात पोहोचणार आहे. म्हणजे 22 डिसेंबरला रिवा येथून सुटलेली गाडी 23 डिसेंबरला रात्री साडेनऊ वाजता मडगाव ला पोहोचणार आहे.
आणि 29 डिसेंबरला दुपारी बारा वाजता रिवा येथून सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 डिसेंबरला मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. मडगाव-रीवा विशेष गाडीबाबत बोलायचं झालं तर ही स्पेशल गाडी मडगावहून 23 डिसेंबर आणि 30 डिसेंबरला रात्री 10:25 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 8:20 वाजता रीवा स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार?
पश्चिम मध्य रेल्वेने जे परिपत्रक काढले आहे त्या परिपत्रकानुसार ही विशेष गाडी या मार्गावरील सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबा घेणार आहे.
म्हणजेच उत्तर महाराष्ट्र सहित कोकण आणि मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी ही गाडी मोठ्या फायद्याची ठरणार आहे. कोकणात आणि गोव्याला सुट्ट्या स्पेंड करायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही गाडी विशेष फायद्याची राहणार आहे.