Mumbai Railway News : मध्य रेल्वेने मुंबईकरांना एक मोठी भेट दिली आहे. ती म्हणजे मध्य रेल्वे प्रशासन येत्या 28 तारखेपासून मुंबईवरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करणार आहे. उन्हाळी हंगामातील सुट्ट्यांमुळे सध्या मुंबई मधून सुटणाऱ्या जवळपास सर्वच गाड्या हाऊसफुल दिसत आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे.
अतिरिक्त गर्दीमुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेकांना तिकीट मिळत नाहीये. यामुळे अनेकांना इतर पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र इतर पर्यायी मार्गांमुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार येत आहे.
यामुळे लग्न सराई, उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच मात्र मुंबईहून उत्तर प्रदेश ला जाणाऱ्यांसाठी आणि उत्तर प्रदेश मुंबईला येणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते गोरखपुर या मार्गावर होत असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या मार्गावर या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण 28 फेऱ्या होणार आहेत.
अर्थातच मुंबई ते गोरखपुर अशा 14 आणि गोरखपुर ते मुंबई अशा 14 फेऱ्या होणार आहेत. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार मुंबई-गोरखपूर चे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर (गाडी क्रमांक 05326) उन्हाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन 28 एप्रिल ते 12 मे 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे.
ही ट्रेन या कालावधीत दररोज 10 वाजून 25 मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. निश्चितच या विशेष गाडीचा या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
खरे तर देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत उत्तर प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त येत असतात. राजधानीत उत्तर प्रदेश मधील कामगारांची संख्या मोठी उल्लेखनीय आहे.
आता मात्र यूपी मधील हे नागरिक उन्हाळी हंगाम असल्याने अन लग्न सराईचा, सणासुदीचा काळ सुरु असल्याने आपल्या मूळ गावाकडे परतणार आहेत. दरम्यान या नागरिकांना मुंबई-गोरखपूर विशेष एक्सप्रेस ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. आता आपण ही गाडी कुठे थांबणार याबाबत माहिती पाहणार आहोत.
कुठे थांबणार ही गाडी ?
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा येणार आहे. यात ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, बाराबंकी, गोंडा, मनकापूर, बस्ती आणि खलीलाबाद या रेल्वे स्टेशनचा समावेश राहणार आहे.