Mumbai Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. राजधानी मुंबई येथील रेल्वे प्रवाशांसाठी हे अपडेट अतिशय महत्त्वाचे आहे. खरतर देशात रेल्वे हे एक प्रवासाचे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. यामध्ये मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे.
दरम्यान मुंबईहून कोकणात गोव्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज थोड्याशा गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कारण की, आज मुंबईहून गोव्याला जाणारी एक महत्त्वाची ट्रेन उशिराने धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 26 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईमधून धावणारी एक महत्वाची एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना थोडासा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण ते संगमेश्वर रोड दरम्यान आज रेल्वे प्रशासनाकडून विशेष ब्लॉक घेतला जाणार असल्याने या मार्गावरील एक एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार आहे. आज 26 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी चिपळूण ते संगमेश्वर रोड या भागात मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील एक एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार आहेत. यामुळे मुंबई येथील रेल्वे प्रवाशांना थोडा काळ त्रास सहन करावा लागू शकतो.
कोणती एक्सप्रेस गाडी उशिराने धावणार ?
रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी गाडी क्र. १२०५१ मुंबई येथील CSMT ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी उशिराने धावणार आहे. ही गाडी आज कोलाड ते चिपळूण या स्थानकांच्या दरम्यान ४० मिनिटे नियंत्रित वेगाने चालवली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी देण्यात आली आहे. यामुळे मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास उशिराने होणार आहे. तथापि, रेल्वे प्रवाशांनी या गाडीने प्रवास करताना याबाबत दक्षता घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.