Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. लोकलमध्ये दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला तर लोकलमध्ये अफाट गर्दी होत असते आणि याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच थर्टी फर्स्ट नाईटच्या सेलिब्रेशनला लोक घराबाहेर निघतात. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण मुंबई, गोव्याला जातात. मुंबईमधील अनेक लोक 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी घराबाहेरनिघतात. दरम्यान 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर १२ अतिरिक्त लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण या बारा अतिरिक्त लोकल गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायद्याचा राहणार असून या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. आता आपण या अतिरिक्त लोकल गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.
कस राहणार वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी म्हणजे 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वे मार्गावर 8 अतिरिक्त लोकल गाड्या चालवणार आहे.
1) चर्चगेट विरार लोकल : पहिली गाडी चर्चगेट येथून मध्ये रात्री सव्वा वाजता सुटणार आहे. दुसरी गाडी चर्चगेट येथून मध्ये रात्री दोन वाजता सुटणार आहे. तिसरी गाडी चर्चगेट येथून मध्यरात्री अडीच वाजता सुटणार आहे. चौथी गाडी चर्चगेट वरून तीन वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे.
2) विरार चर्चा गेट लोकल : पहिली गाडी मध्यरात्री सव्वा बारा वाजता विरार येथून सुटणार आहे. दुसरी गाडी मध्यरात्री पाऊण वाजता विरार येथून सुटणार आहे.
31 डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य रेल्वे मार्गावर दोन अतिरिक्त लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. मध्यरात्री दीड वाजता सीएसएमटी कल्याण लोकल गाडी सीएसएमटी स्थानकावरून सोडली जाणार आहे. तसेच कल्याण सीएसएमटी लोकल ही कल्याणस्थानकावरून मध्यरात्री दीड वाजता सोडले जाणार आहे.
31 डिसेंबरच्या मध्यरात्री हार्बर रेल्वे मार्गावर सुद्धा 2 विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर मध्यरात्री १.३० वाजता सीएसएमटी पनवेल लोकल गाडी सोडली जाणार आहे. तसेच मध्यरात्री दीड वाजता पनवेल सीएसएमटी लोकल ट्रेन पनवेल स्थानकावरून सोडली जाणार आहे.