Mumbai Railway News : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक संपूर्ण भारतीय बनावटीची एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवरच सुरू केली जाणार आहे. खरतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन आता पाच वर्षांचा काळ उलटला आहे.
या पाच वर्षांच्या काळात या ट्रेनला प्रवाशांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला आहे. प्रवाशांमध्ये ही गाडी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सध्या स्थितीला देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. यापैकी सहा मार्ग तर आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे या 6 वंदे भारत एक्सप्रेसला चांगला रिस्पॉन्स देखील मिळत आहे. पण वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सर्वसामान्यांसाठी परवडत नसल्याचा आरोप केला जात आहे. ही गाडी फक्त उच्चवर्गीय लोकांसाठी सुरू आहे असा आरोप देखील होतो. यामुळे आता भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे साधारण ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नवीन गाडीचे तिकीट दर कमी राहणार आहेत. पण ही गाडी नॉन एसी राहणार आहे. मात्र या गाडीचा वेग वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच राहील असा अंदाज आहे. दरम्यान, राजधानी मुंबईहून लवकरच वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन धावणार असे वृत्त समोर आले आहे. चेन्नई येथील कोच फॅक्टरीमध्ये ही गाडी तयार झाली असून राजधानी मुंबईत वंदे साधारण ट्रेन दाखल झाली आहे.
यामुळे येत्या काही दिवसात राजधानी मुंबईहून वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार असे चित्र तयार होत आहे. विशेष म्हणजे मुंबईहून दोन वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या एक्सप्रेसमध्ये पुश पुल टेक्नॉलॉजी असलेले दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेले आहेत. एक्सप्रेसमध्ये 12 स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.
राजधानी मुंबईहून कोणत्या शहरासाठी सुरू होणार वंदे साधारण ट्रेन
वंदे साधारण ट्रेन भगवा आणि कराडा रंगात तयार करण्यात आले आहे. या गाडीचा वेग हा 130 किलोमीटर प्रति तास एवढा असेल. ही गाडी नॉन एसी असेल मात्र यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्या सोयी सुविधा राहणार आहेत. ही गाडी आता मुंबईत दाखल झाली असून कसारा घाटात या गाडीचे परीक्षण केले जाणार आहे. यानंतर ही गाडी मुंबई ते पटना आणि मुंबई ते दिल्ली दरम्यान चालवली जाणार अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच करणार आहेत. तत्पूर्वी मात्र या गाडीचे परीक्षण केले जाणार आहे. कसारा घाटात या गाडीचे यशस्वी परीक्षण पूर्ण झाले की मग ही गाडी सुरू होईल. निश्चितच राजधानी मुंबईला आगामी काही महिन्यांमध्ये वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेनची दखील भेट मिळणार आहे हे जवळपास नक्की झाले असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.