Mumbai Railway News : मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई शहरात एक नवीन उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा नवीन पूल तयार केला जाणार असून यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होईल आणि नागरिकांचा प्रवासा आणखी सुलभ होणार आहे.
गेल्या काही दशकांमध्ये मुंबई शहरात आणि उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना एक दोन किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तरीदेखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे
च कारण आहे की आता मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासोबतच शासनाच्या माध्यमातून मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोचे देखील जाळे विकसित केले जात आहे.
मेट्रोमार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात नियंत्रणात आली आहे. मात्र असे असले तरी अजूनही शहरातील वाहतूक कोंडीची समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. दरम्यान मुंबई महापालिकेने बोरिवली ते मुलुंड या दरम्यानचा प्रवास गतिमान बनवण्यासाठी एक नवीन उड्डाणपूल विकसित करण्याची योजना आखली आहे.
या अंतर्गत मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मालाड पश्चिम येथील मालाड जलाशय ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अप्पापाडा दरम्यान नवीन उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे.
विशेष म्हणजे हा उड्डाणपूल गोरेगाव ते मुलुंड लिंक रोड रस्त्याला कनेक्ट केला जाणार आहे. यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे.
हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर बोरिवली ते मुलुंड हा प्रवास फक्त एका तासात पूर्ण होईल असा दावा महापालिकेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आला आहे. हा पूल ९०० मीटर लांबीचा असेल. हा पूल सिमेंट काँक्रीट, स्टीलचा वापर करून बांधण्यात येणार आहे.
तसेच सिमेंट काँक्रीटचा पोहोच रस्ताही विकसित केला जाणार आहे. गोरेगाववरून पूर्व उपनगरात मुलुंड गाठण्यासाठी जीएमएलआर अर्थातच गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प विकसित केला जात असे.
दरम्यान या लिंक रोड प्रकल्पाअंतर्गत बांधल्या जात असलेल्या रस्त्याला रत्नागिरी हॉटेलपासून हा नवीन उड्डाणपूल जोडला जाणार असे सांगितले जात आहे. यामुळे मुलुंड ते बोरिवली हा प्रवास गतिमान होणार आहे.
सध्या हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दोन तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. पण हा पूल तयार झाल्यानंतर हा प्रवास फक्त पाऊण तासात किंवा एका तासात पूर्ण होऊ शकतो असे सांगितले जात आहे.