Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. भारतीय रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जर जायचे असेल तर रेल्वेलाच नेहमी पसंती मिळत असते. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर रेल्वेला पसंती मिळते.
रेल्वेचा प्रवास सुरक्षित आणि खिशाला परवडणारा देखील आहे. विशेष म्हणजे रेल्वे कडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर नवीन रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.
अशातच आता नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच राजधानी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवीन वर्षापूर्वीच देशाच्या आर्थिक राजधानी मधील रेल्वे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने मुंबईहून एक साप्ताहिक ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. ही गाडी मुंबई ते उत्तर प्रदेश मधील मऊ या दरम्यान चालवली जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की उत्तर प्रदेश मधील नागरिक रोजगाराच्या शोधात मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या उत्तर प्रदेश मधील नागरिकांची संख्या खूपच अधिक आहे.
अशा परिस्थितीत, मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या याच उत्तर प्रदेश मधील नागरिकांसाठी रेल्वेने ही साप्ताहिक ट्रेन चालवण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे मुंबई ते मऊ, उत्तर प्रदेश हा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
ही गाडी मऊ ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मऊ-एलटीटी स्पेशल ट्रेन १६ डिसेंबरपासून दर शनिवारी चालवली जाणार आहे.
म्हणजेच ही गाडी आठवड्यातून एकदा चालवली जाईल. ही साप्ताहिक ट्रेन मऊ येथून रात्री सव्वा दहा वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पावणेचार वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे.
तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ स्पेशल ट्रेन 18 डिसेंबर पासून दर सोमवारी चालवली जाणार आहे. ही साप्ताहिक ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी 11.10 वाजता रवाना होणार आहे आणि दुसऱ्या सायंकाळी साडेसहा वाजता मऊ रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं थांबणार गाडी
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, हरदा, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रयाग, फुलपूर, जंघाई, मडियाहुन, जौनपूर, शहागंज, खोरासन रोड, आझमगड, मुहम्मदाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल अशी माहिती देण्यात आली आहे.