Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच कामाची राहणार आहे. कारण की मुंबईहुन एक स्पेशल रेल्वे गाडी सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन वर्ल्ड कपच्या भारत पाकिस्तान मॅचसाठी सुरू केली जाणार आहे.
खरतर भारताने नुकत्याच सुरु झालेल्या विश्वचषकात आपला पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळून आपल्या नावावर केला आहे. तसेच आज भारताचा दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. यानंतर मग भारताचा तिसरा सामना हा 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान सोबत रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
वास्तविक भारत-पाकिस्तानचा सामना हा नेहमीच हाय व्होल्टेज राहतो. या सामन्याची लाखो क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेने या सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबई मधील क्रिकेट प्रेमींसाठी खूप खास राहणार आहे.
कारण की भारत पाकिस्तान मॅचच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मुंबईवरून अहमदाबादसाठी एक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. सदर वृत्तानुसार भारत पाकिस्तान मॅचच्या पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता मुंबईवरून एक ट्रेन अहमदाबादकडे रवाना होणार आहे.
ही ट्रेन सकाळी सहा वाजता अहमदाबाद मध्ये पोहोचणार आहे. म्हणजे ज्या दिवशी मॅच आहे त्या दिवशी ही ट्रेन सकाळी पोहोचेल. याशिवाय ज्या दिवशी सामना आहे म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी मुंबईवरून वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबादकडे रवाना होणार आहे.
त्यामुळे मुंबईवरून अहमदाबादला भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींना याचा मोठा फायदा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेचा हा निर्णय क्रिकेट प्रेमींसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. मुंबईमधील क्रिकेट प्रेमींनी या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले आहे.
मात्र ही स्पेशल ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबेल याबाबत कोणतीच माहिती आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ही गाडी सुरत, वडोदरा, आनंद आणि भरूच या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबू शकते.