Mumbai Railway News : येत्या काही दिवसांनी देशात रक्षाबंधनाचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांसाठी काही विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वे विभागाने मुंबईहून विविध शहरांसाठी विशेष एक्सप्रेस गाड्यांची घोषणा केली आहे.
19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार असून या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. हेच कारण आहे की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबईहून काही विशेष एक्सप्रेस गाड्या सोडल्या जाणार आहेत.
या गाड्यांमुळे रेल्वेमध्ये होणारी अतिरिक्त प्रवाशांची गर्दी नियंत्रणात राहील असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
खरे तर या दोन्ही शहरात दरम्यान रोजाना हजारो प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. सणासुदीच्या काळात ही वर्दळ आणखी वाढणार आहे. यामुळे या व्यस्त मार्गावर ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
सी एस एम टी-कोल्हापूर विशेष गाडी ( गाडी क्रमांक 01417 ) येत्या मंगळवारी म्हणजेच 20 ऑगस्टला 00.20 वाजता CSMT मुंबई येथून सुटणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 01418 म्हणजे श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस-श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्सप्रेस येत्या रविवारी म्हणजे उद्या 18.08.2024 ला 22.00 वाजता कोल्हापूर येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 13.30 वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस गाडीला कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.