Mumbai Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असते. नवरात्र उत्सव, विजयादशमी अर्थातच दसरा, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यानही रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
यामुळे रेल्वे दरवर्षी या सणासुदीच्या काळात अतिरिक्त गाड्या चालवत असते. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित होतो. दरम्यान येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सव, विजयादशमी आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर काही विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
या विशेष गाड्या उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ अन जळगाव रेल्वे स्थानकावरून धावणार असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला देखील मोठा दिलासा मिळणार आहे.
यातील काही गाड्यांना भुसावळला तर काही गाड्यांना जळगावला थांबा राहणार आहे. आता आपण मध्य रेल्वेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन
मिळालेल्या माहितीनुसार, एलटीटी ते नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी राहणार असून ही ट्रेन ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीला भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
सीएमएसटी ते गोरखपूर दरम्यान देखील विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी 22 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाईल. या गाडीला जळगाव येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थातच एलटीटी मुंबई ते दानापुर यादरम्यानही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासन या मार्गावर 22 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालू होणार असून ही गाडी भुसावळ येथे थांबणार आहे.
या तिन्ही गाड्यांमुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. जे लोक मुंबईहून उत्तर भारताकडे प्रवास करतील त्या लोकांसाठी या गाड्या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई वरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रवासी उत्तर भारतात जात असतात. यंदाही सणासुदीच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि याच अनुषंगाने मध्य रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.