Mumbai Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट राजधानी मुंबईहुन पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे.
कारण की, मध्य रेल्वेने राजधानी मुंबईहून पश्चिम महाराष्ट्रासाठी चार विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईहून पश्चिम महाराष्ट्रातील दोन शहरांसाठी दोन एकेरी विशेष गाड्या आणि विदर्भातील एका शहरासाठी दोन विशेष गाड्यां चालवल्या जाणार आहेत.
कोणत्या मार्गावर सुरु होणार एकेरी स्पेशल ट्रेन?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते कोल्हापूर आणि मुंबई ते सोलापूर या दोन महत्त्वाच्या मार्गावर प्रत्येकी एकेरी विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सोलापूर दरम्यान एकेरी विशेष गाडी चालवली जाणार असून ही गाडी 3 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांनी सोलापूर कडे सुटेल आणि त्याच दिवशी नऊ वाजता सोलापूरला पोहोचणार आहे.
तसेच मुंबई ते कोल्हापूर दरम्यान 3 ऑक्टोबर रोजी वनवे विशेष गाडी चालवली जाणार आहे. ही गाडी 3 ऑक्टोबरला सकाळी 05:25 मिनिटांनी मुंबईहून रवाना होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी कोल्हापूरला पोहोचणार आहे.
तसेच मुंबई ते नागपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवल्या जाणार असून यापैकी एक गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 3 ऑक्टोबर रोजी मध्ये रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी नागपूरकडे रवाना होईल आणि त्याच दिवशी तीन वाजून 35 मिनिटांनी ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे.
यासोबतच मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस वरून दुसरी एकेरी विशेष रेल्वे गाडी 4 ऑक्टोबर रोजी म्हणजेच बुधवारी मध्यरात्री बारा वाजून 45 मिनिटांनी मुंबई येथून रवाना होईल आणि दुपारी तीन वाजून 32 मिनिटांनी ही गाडी नागपूरला पोहोचणार आहे.