Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष महत्त्वाची आहे. खरे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे.
या शहराला स्वप्ननगरी म्हणून ओळखले जाते. मुंबईमध्ये देशातील कानाकोपऱ्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात दाखल होत असतात.
यामध्ये उत्तर प्रदेश मधून येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेश मधील हजारो लोक कामानिमित्त मुंबईमध्ये आले आहेत.
दरम्यान, मुंबई शहरात स्थायिक झालेल्या याच लोकांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईहून उत्तर प्रदेश मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी एक विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचे जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभागाकडून राजधानी मुंबई ते उत्तर प्रदेश मधील मऊ दरम्यान एक साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी या मार्गावरील सहा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.
कसा राहणार रूट
मुंबई ते मऊ दरम्यान धावणारी ही साप्ताहिक गाडी दर शनिवारी मऊ रेल्वे स्टेशनवरून चालवली जाणार आहे. ही गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाणार अशी माहिती समोर आली आहे.
या साप्ताहिक ट्रेनला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून हिरवाचंदा दाखवला आहे.
ही गाडी मुहमद्दाबाद गोहना, जोनपुर, आजमगड, प्रयागराज, शहागंज, माणिकपूर या मार्गे धावणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक
ही एक साप्ताहिक ट्रेन असेल. म्हणजेच ही गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही गाडी उत्तर प्रदेश येथील मऊ रेल्वे स्थानकावरून दर शनिवारी रवाना होणार आहे.
या दिवशी ही गाडी रात्री सव्वादहा वाजता मऊ रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि सोमवारी सकाळी पावणेचार वाजता मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.