Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने दसरा आणि दिवाळी सणाच्या आधीच प्रवाशांना एक मोठी भेट दिली आहे. मुंबईहून आता एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या गाडीचा असंख्य प्रवाशांना फायदा होणार असून दिवाळी सणाच्या कालावधीत होणारी अतिरिक्त गर्दी या गाडीमुळे नियंत्रणात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होत असणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस ते रक्सोल दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या 36 फेऱ्या होणार आहेत. दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक नेमके कसे आहे हे गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एलटीटी रक्सौल विशेष एक्सप्रेस ट्रेन ( गाडी क्रमांक ०५५८६ ) ६ ऑक्टोबर ते २ फेब्रुवारी २०२५ या काळात चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर रविवारी दुपारी ४ वाजता एलटीटी येथून सोडली जाणार आहे आणि रक्सौल येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचणार आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या १८ फेऱ्या होणार आहेत. तसेच, गाडी क्रमांक ०५५८५ म्हणजेच रकसोल ते एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन ४ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर शुक्रवारी रक्सौल येथून दुपारी ४.५५ वाजता सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता एलटीटी स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील भुसावळ या रेल्वेस्थानकावर देखील या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आली आहे. यामुळे भुसावळ सहित आजूबाजूच्या परिसरातील रेल्वे प्रवाशांना या विशेष एक्सप्रेस ट्रेन चा फायदा होणार आहे.