Mumbai Railway News : ऑगस्ट महिना सुरू झाला की भारतात सणासुदीचा काळ सुरू होतो. दरवर्षी या फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या दिवसात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत असते. फेस्टिव सिझनमध्ये मुंबईहून आपल्या गावाकडे जाणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात वधारत असते. मुंबईहुन मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वेने आपल्या गावाकडे जातात.
गणेशोत्सवाच्या काळात देखील रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. याच संभाव्य अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असते.
दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर या काळात अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध होत नाहीत. यामुळे इतर पर्यायी मार्गाचा नागरिकांना अवलंब करावा लागतो. खाजगी वाहनांनी नागरिकांना प्रवास करावा लागतो आणि यामुळे सर्वसामान्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असते.
पण, यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी पर्यंत विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
दरवर्षी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठी उल्लेखनीय असते. यंदाही अशीच गर्दी होणार आहे. यावर्षीही नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात जाणार आहेत. यामुळे एलटीटी ते रत्नागिरी दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या गाडीसाठी 7 ऑगस्ट पासून आरक्षण सुरू होणार आहे.
म्हणजेच उद्यापासून या गाडीसाठी तिकीट बुक करता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण एलटीटी ते रत्नागिरी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही माहिती पाहणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार एलटीटी-रत्नागिरी विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 01031) 6, 7, 13 आणि 14 सप्टेंबर ला एलटीटी मुंबईतून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी एलटीटी येथून आठ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चार वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी रत्नागिरी जंक्शन वर पोहोचणार आहे.
म्हणजेच या विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या चार फेऱ्या होणार आहेत. तसेच, रत्नागिरी-एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 01032 सात, आठ, 14 आणि 15 सप्टेंबरला रत्नागिरी येथून सोडली जाणार आहे.
या दिवशी ही गाडी रत्नागिरी येथून सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी सव्वा पाच वाजता पोहोचणार आहे. या विशेष एक्सप्रेस ट्रेन चा देखील चार फेऱ्या होणार आहेत. अर्थातच 01031 आणि 01032 या दोन्ही विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या प्रत्येकी चार अशा एकूण आठ फेऱ्या होणार आहेत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबा घेणार आहे.