Mumbai Railway News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमध्ये शिक्षण, नोकरी आणि उद्योगासाठी संपूर्ण देशभरातून नागरिक येतात. मुंबईमध्ये रोजगाराच्या शोधात येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रामुख्याने उत्तर प्रदेश मधून रोजगाराच्या शोधात येणाऱ्यांची संख्या ही विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान उत्तर प्रदेश येथील बलिया आणि गाजियापूर येथून मुंबईसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाराणसी येथून मुंबईसाठी चालवली जाणारी कामयानी एक्सप्रेस आता बलिया येथून सोडली जाणार आहे.
यामुळे बलिया व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बलिया रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी ट्रेन पकडता येणार आहे.
खरे तर बलिया, गाजियापूर व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक रोजगाराच्या शोधात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होतात.
मात्र या नागरिकांना सध्या स्थितीला मुंबई जाण्यासाठी जर ट्रेन पकडायची असेल तर जयनगर रेल्वे स्टेशनला जावे लागते.
आता मात्र बलिया आणि गाजीपुर येथील रेल्वे प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी बलिया रेल्वे स्थानकावरून ट्रेन उपलब्ध होणार आहे. कामयानी एक्सप्रेस आता बलिया रेल्वे स्थानकावरून धावणार आहे.
केव्हापासून होणार अंमलबजावणी ?
रेल्वेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच 10 डिसेंबरपासून होणार आहे. उद्यापासून कामयानी एक्स्प्रेस (11072) दररोज बलियाहून मुंबईसाठी चालवली जाणार आहे. यामुळे उत्तर प्रदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक ?
ही गाडी रोज दुपारी 12.45 वाजता सुटेल, जी गाझीपूर शहरात दुपारी 1.55 वाजता पोहोचेल. यानंतर, 5 मिनिटांच्या थांब्यानंतर, ते गाझीपूरच्या अनरिहार जंक्शनला दुपारी 2:45 वाजता पोहोचेल. येथून 5 मिनिटांनी सुटेल आणि दुपारी 3.50 वाजता वाराणसी कॅंटला पोहोचेल, तेथून 5 वाजता 10 मिनिटांच्या थांब्यानंतर मुंबईसाठी प्रस्थान करणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
हाती आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन गाझीपूर सिटी, अनरिहार जंक्शन, वाराणसी जंक्शन, भदोही, सुरियावन, जंघाई जंक्शन, फुलपूर, प्रयागराज जंक्शन, दाभौरा, माणिकपूर, माझगवान, सतना, मैहर, कटनी मुरवारा, बंदकपूर, दमोह, पथरिया, सागर, खुराई, बिना जंक्शन, गंज बसो विदिशा, भोपाळ जंक्शन, राणी कमलापती, नर्मदापुरम, इटारसी जंक्शन, हरदा, खिरकिया, चनेरा, खांडवा, नेपानगर, बुरहानपूर, रावेर, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, चाळीसगाव जंक्शन, नांदगाव, मनमाड जंक्शन, लासलगाव, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जंक्शन, ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. निश्चितच रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाचा उत्तर प्रदेश मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.