Mumbai Railway : 6 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतात महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाला पोरके करून गेलेत. या दिवशी महामानवाच्या दर्शनासाठी मुंबईतील परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने आंबेडकरवादी जनता आणि बौद्ध अनुयायी जमा होत असतात.
चैत्यभूमी हे मुंबईतील दादर भागात वसलेले महामानवाचे स्मृतीस्थळ आहे. हे एक चैत्यस्मारक म्हणून ओळखले जाते. येथील स्तूप हे आंबेडकरवादी जनतेचे आणि बौद्ध अनुयायांचे एक प्रमुख श्रद्धास्थान आहे. म्हणून महापरिनिर्वाण दिनाला महामानवास अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण भारतातून लाखो अनुयायी जमा होतात. दरवर्षी या दिवशी डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.
दरम्यान ही लाखोंची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे संपूर्ण देशभरातून मुंबईमध्ये येणारे आंबेडकरवादी जनतेसाठी आणि बौद्ध अनुयायांसाठी विशेष 12 गाड्या चालवणार आहे. यामुळे महामानवाचे महापरिनिर्वाणदिनी दर्शन सोपे होणार आहे. दरम्यान आता आपण मध्य रेल्वेच्या या 12 विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि कोणत्या मार्गावर या गाड्या धावणार याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या मार्गांवर धावणार विशेष गाड्यां
कुर्ला-परळ विशेष कुर्ला
कल्याण-परळ विशेष कल्याण
ठाणे-परळ विशेष ठाणे
परळ-ठाणे विशेष परळ
परळ-कल्याण विशेष परळ
परळ-कुर्ला विशेष परळ
वाशी-कुर्ला विशेष वाशी
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल
वाशी-कुर्ला विशेष वाशी
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला-परळ विशेष ही गाडी 00.45 वाजता कुर्ला येथून रवाना होणार आहे आणि परळ येथे 01.05 वाजता पोहोचणार आहे.
परळ-ठाणे विशेष गाडी परळ येथून सव्वा वाजता निघेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
वाशी-कुर्ला विशेष ही गाडी वाशी रेल्वे स्थानकावरून दीड वाजता निघेल आणि कुर्ला येथे दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार आहे.
कल्याण-परळ विशेष ही गाडी कल्याण रेल्वे स्थानकावरून एक वाजता रवाना होणार आहे आणि परळ येथे सव्वा दोन वाजता पोहोचणार अशी माहिती देण्यात आली आहे.
वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशी रेल्वे स्थानकावरून तीन वाजून दहा मिनिटांनी रवाना होईल आणि कुर्ला येथे तीन वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.
ठाणे-परळ विशेष ही विशेष गाडी ठाणे रेल्वे स्थानकावरून दोन वाजून दहा मिनिटांनी रवाना होईल आणि परळ येथे 2:55 मिनिटांनी पोहोचणार आहे.
परळ-कल्याण विशेष परळ ही गाडी 02.25 वाजता परळ रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि कल्याणी ते तीन वाजून 40 मिनिटांनी पोहोचणार अशी माहिती समोर आली आहे.
परळ-कुर्ला विशेष परळ ही मध्य रेल्वे कडून सुरू झालेले विशेष शिकारी परळ येथून तीन वाजून पाच मिनिटांनी रवाना होईल आणि कुर्ला येथे तीन वाजून वीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
पनवेल-कुर्ला विशेष पनवेल ही विशेष गाडी पनवेल येथून एक वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि कुर्ला या ठिकाणी पावणेतीन वाजता पोहोचणार आहे.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला ही विशेष गाडी कुर्ला रेल्वे स्थानकावरून अडीच वाजता वाशीच्या दिशेने रवाना होईल आणि वाशी येथे ही ट्रेन तीन वाजता पोहोचणार आहे.
कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला ही गाडी कुर्ला रेल्वे स्थानकावरून 03.00 वाजता रवाना होईल आणि पनवेल रेल्वे स्थानकावर 04.00 वाजता पोहोचणार आहे.
कुर्ला-वाशी विशेष कुर्ला ही विशेष गाडी कुर्ला रेल्वे स्थानकावरून चार वाजता रवाना होणार आहे आणि वाशी येथे चार वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.