Mumbai Pune Travel : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यां प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात या दोन्ही महानगरादरम्यानचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. सध्या या दोन्ही महानगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो.
रस्ते मार्गाने प्रवास करताना प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे मोठा फटका बसतोय, रेल्वेचा प्रवास देखील तेवढाच आव्हानात्मक आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान झाला आहे. तरीही प्रवाशांना अडीच ते तीन तासांचा वेळ लागतो.
वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा इतर गाड्यांपेक्षा अधिक आहे. जर इतर एक्सप्रेस गाड्यांनी हा प्रवास करायचा झालं तर प्रवाशांना चार तासापर्यंतचा वेळ खर्च करावा लागतो. पण, आता या दोन्ही शहरांदरम्यान हायपरलूप ट्रेन धावणार आहे. 2029 पर्यंत हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होईल.
येत्या चार वर्षांनी हा प्रकल्प प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी खुला होईल आणि यानंतर मग अवघ्या अर्धा तासात मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की हा भारतातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प राहणार आहे.
या देशातील पहिल्या-वहिल्या प्रकल्पामुळे देशातील वाहतुकीच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती येणार असून यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. ही वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित देखील राहणार आहे. हायपरलूपमध्ये व्हॅक्युम ट्यूबमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हीटेटिंग पॉड असतात.
विद्युत चुंबकीय शक्तीच्या मदतीने हे पॉड्स पुढे जातात. हायपरपूलमुळे मुंबई-पुणे प्रवास फक्त 25 ते 30 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. वाहतुकीच्या अन्य माध्यमांच्या तुलनेमध्ये हा प्रकार अधिक सुरक्षित असणार आहे.
वाहतुकीचा हा नवा प्रकार इकोफ्रेंडली देखील आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे संवर्धन देखील होणार आहे. विशेष बाब अशी की मुंबई ते पुणे दरम्यान हायपरलुप ट्रेनने प्रवास करायचा झाल्यास फक्त 1000 ते 1500 रुपयांचे तिकीट राहणार आहे.
सध्या मुंबई ते पुणे असा विमान आणि प्रवास करायचा झालं तर तीन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. म्हणजेच हायपरलूप ट्रेनचा प्रवास हा विमानापेक्षा वेगवान आहे आणि यासाठी तिकीटही कमी राहणार आहे.