Mumbai Pune Railway : देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांदरम्यान जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी अनेक एक्सप्रेस सुरू आहेत.
दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुरु झालेल्या मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा देखील पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करण्यासाठी उपयोग होत आहे. यामुळे निश्चितच मुंबई ते पुणे हा प्रवास जलद झाला आहे.
परंतु मुंबई ते पुणे या दोन शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही प्रवाशांची संख्या लक्षात घेता आता मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस बाबत एक मोठा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी गोड बातमी ! ‘हा’ मेट्रो मार्ग प्रकल्प आता लवकरच होणार पूर्ण; सिडको उभारणार प्रकल्प, शासनाचा हिरवा कंदील
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सिंहगड एक्सप्रेसला आता एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. या महत्त्वाच्या मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती रेल्वेने या ठिकाणी दिली आहे.
निश्चितच एक अतिरिक्त डबा जोडला गेला असल्याने आता मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ होणार असून यामुळे एकाच वेळी अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सिंहगड एक्सप्रेस सध्या 15 डब्ब्यांसह धावत आहे. मात्र आता या एक्सप्रेसला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे म्हणजेच आता ही ट्रेन 16 डब्ब्यासह धावणार आहे.
हे पण वाचा :- काय सांगता ! आता महाराष्ट्रात तलाठी राहणार नाही; तलाठी पद रिक्त करण्यासंदर्भात कृषीमंत्र्यांनी दिले मोठे संकेत
मध्य रेल्वेने याबाबत दिलेल्या अधिकच्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ११००९/११०१० सिंहगड एक्स्प्रेसला आता एक द्वितीय श्रेणी चेअर कार (नॉन-एसी) कोच जोडला जाणार आहे.
म्हणजे आता सिंहगड एक्स्प्रेसला एक वातानुकूलित चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारसह एकूण १६ डबे राहणार आहेत.
निश्चितच, मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या हिताचा असून यामुळे रोजाना मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषता जे प्रवासी सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करणार असतील अशा प्रवाशांसाठी ही एक आनंदाचीच बाब राहणार आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘या’ दोन शहरात लवकरच सुरु होणार वंदे मेट्रो, 1 रुपये प्रति किलोमीटर राहणार भाडे, पहा….