Mumbai Pune Railway News : नुकताच गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व संपन्न झाला आहे. आता साऱ्यांना वेध लागले आहे ते दसरा, दिवाळीचे. लवकरच नवरात्र उत्सवाचा सण सुरू होणार आहे. नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाईल आणि ऑक्टोबरच्या शेवटी दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी दसरा, दिवाळीच्या सणाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
या काळात मुंबई, पुण्यामध्ये कामानिमित्त आलेले नागरिक आपल्या मूळ गावाकडे परतत असतात. मुंबई, पुण्यात मराठवाड्यातील जनता देखील मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेली आहे. शिक्षण, व्यापार, रोजगार निमित्त मराठवाड्यातील जनता मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये वास्तव्याला असते. दरम्यान, याच नागरिकांसाठी दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करिमनगर-पुणे, नांदेड-पनवेल व करिमनगर-मुंबई या तीन विशेष गाड्या यंदा दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत चालवल्या जाणार असून या गाड्या मनमाड मार्गे धावणार आहेत. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार नांदेड-पनवेल एक्सप्रेस चे वेळापत्रक?
नांदेड- पनवेल एक्सप्रेस ही दिवाळी विशेष गाडी २१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी नांदेड स्थानकावरून सोमवार आणि बुधवारी रात्री अकरा वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1:35 वाजता पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून 22 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान सोडली जाणार आहे.
या काळात ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल स्थानकावरून दुपारी अडीच वाजता निघेल आणि नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेचार वाजता पोहोचणार आहे. नांदेड-पनवेल विशेष एक्सप्रेस ट्रेन परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक मार्गे चालवली जाणार अशी माहिती रेल्वेने दिली आहे.
पुणे-करिमनगर-पुणे
ही विशेष एक्सप्रेस ट्रेन आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी 21 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबरला पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी रात्री दहा वाजून 45 मिनिटांनी पुण्यावरून रवाना होईल आणि करीमनगर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजता पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी 23 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर 6 नोव्हेंबर आणि 13 नोव्हेंबरला करीमनगर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दिवशी ही गाडी करीमनगर रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेदहा वाजता पुण्याला पोहोचणार आहे.
मुंबई-करीमनगर-मुंबई विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
29 ऑक्टोबर आणि पाच नोव्हेंबरला ही गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. या दोन दिवशी ही गाडी दुपारी साडेतीन वाजता एलटीटी रेल्वे स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी साडेआठ वाजता करीमनगरला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी 30 ऑक्टोबर व 6 नोव्हेंबरला करीमनगर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड या मार्गाने चालवली जाणार आहे.