Mumbai Pune Navin Mahamarg : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थातच 2014 पासून देशात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. वेगवेगळ्या महामार्ग प्रकल्पांमुळे देशातील वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम झाल्याचे दिसते.
आपल्या महाराष्ट्रातही हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत सर्वच ठिकाणी विनाअडथळा वाहतूक शक्य होत असून यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला चालना मिळत आहे.
अशातच आता महाराष्ट्रासाठी आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. कारण की महाराष्ट्राला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या काळात एका एक्स्प्रेस वेलगत दुसरा द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार आहे.
मुंबई ते पुण्यासह पुढे प्रवास करणाऱ्यांना या नव्या महामार्गाचा प्रवास अनुभवता येणार आहे. मुंबई ते बेंगळुरूमार्गे पुणे हा नवा द्रुतगती मार्ग तयार केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्गाचा पहिला टप्पा जेएनपीटी ते चौक (कर्जत) असा राहणार आहे.
या मार्गाचा बृहत् प्रकल्प आराखडा म्हणजे डीपीआर ज्याला इंग्लिश मध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट असे म्हणतात तो तयार सुद्धा झाला आहे. आता हा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.
मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास जलद व्हावा या अनुषंगाने 22 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग विकसित करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास सुरुवातीच्या टप्प्यात जलद झाला होता यात शंकाच नाही.
मात्र आता या महामार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे पुन्हा एकदा या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या जाणू लागली आहे आणि यामुळे येथील प्रवासात रिस्की बनला आहे. या मार्गावर अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जातो. मात्र आता या समस्येपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होणार आहे. कारण की, सध्या अस्तित्वात असणाऱ्या या महामार्गाच्या जवळून दुसरा एक असाच द्रुतगती महामार्ग उभारला जाणार आहे.
तो सध्याच्या ‘एक्स्प्रेस वे’ला ओलांडून पूर्व दिशेला पुढे जाऊन दक्षिणेकडे वळण घेणार आहे. त्याचवेळी हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई-बेंगळुरू असला, तरीही तो जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून (जेएनपीए) सुरू होणार आहे.
या नवीन महामार्गाची उभारणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा नवा महामार्ग मुंबई-बेंगळुरू व्हाया पुणे असा राहणार. मात्र, त्याची सुरुवात जेएनपीएपासून होईल. जेएनपीए ते चौक, असा ३२ किमी लांबीचा पूर्णपणे नवा रस्ता या अंतर्गत विकसित होईल.
महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या टप्प्याचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच, तो मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. आता त्याला मंजुरी मिळाली की लगेचच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. हा नवा महामार्ग 14 पदरी राहणार आहे.
या प्रकल्पाची किंमत 17000 कोटी रुपये एवढी राहील अशी माहिती समोर आली आहे. नक्कीच या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे आणि पुढे बेंगलोर पर्यंतचा प्रवास जलद होणार असून यामुळे वाहतुकीच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती येईल असा विश्वास तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.