Mumbai-Pune Missing Link Inauguration : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर वेगवेगळी महामार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही महामार्गाच्या दुरुस्त्या देखील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केल्या जात आहेत. असं सांगतात की, कोणत्याही राज्याच्या विकासात त्या राज्यातील वाहतूक व्यवस्था एक महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावत असते.
राज्याचा विकास हा खऱ्या अर्थाने तेथील दळणवळण व्यवस्थेवरच मोजला जात असतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून आपापल्या स्तरावर देशाचा आणि राज्याचा विकास सुनिश्चित करण्यासाठी रस्ते विकासाच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात आले आहे.
हे पण वाचा :- मच्छिंद्रभाऊ मानलं! कांद्याच्या आगारात फुलवली केळीची शेती, झाली लाखोंची कमाई बनले लखपती
या मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका विकसित केली जात असून याच नवीन मार्गिकेला मिसिंग लिंक प्रोजेक्ट म्हणून ओळखले जात आहे. दरम्यान आता या नवीन मार्गिकेसंदर्भात म्हणजेच मिसिंग लिंक प्रोजेक्ट संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मिसिंग लिंक प्रोजेक्टचे काम जवळपास 65 टक्के पूर्ण झाले आहे. अशा परिस्थितीत हा मार्ग आता 2024 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
वास्तविक डिसेंबर 2023 पर्यंत या मिसिंग लींक प्रोजेक्ट चे काम पूर्ण करून वाहतूक सेवेत हा प्रकल्प सादर केला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल आणि जानेवारी 2024 मध्ये हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. निश्चितच प्रकल्पाचे जवळपास 35 टक्के काम अद्याप बाकी आहे. यामुळे हा प्रकल्प येत्या काही महिन्यात मार्गी लागेल का हाच मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वास्तविक मुंबई पुणे महामार्गामुळे जरी प्रवास जलद झाला असला तरीही या मार्गावरील अपघातांची मालिका ही एक चिंतेची बाब होती. या मार्गावरील वाहतूक अपघात रोखण्यासाठी, प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान बनवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली ते कुसगावदरम्यान नवीन मार्गिका म्हणजे मिसिंग लेन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पची एकूण लांबी ही १९.८० किमी असून या नव्या मार्गिकेच्या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान आता डिसेंबर अखेर या मार्गीकेचे काम पूर्ण होणार असून जानेवारी 2024 पासून ही मार्गीका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होईल तेव्हा मुंबई पुणे महामार्गावरील प्रवासाचा कालावधी वीस ते पंचवीस मिनिटांनी कमी होईल. निश्चितच, गेल्या काही महिन्यांपासून या मिसिंग लिंक प्रकल्पाची प्रवाशांना आतुरता असून लवकरच आता हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट सुरु होईल असं मत व्यक्त केल जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईवासियांसाठी खुशखबर ! अखेर मुहूर्त लागला; ‘हा’ महत्त्वाचा रेल्वे मार्ग 15 एप्रिलला होणार सुरू