Mumbai Pune Expressway Tunnel News : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन अतिशय महत्त्वाची शहर आहेत. मुंबई राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी तसेच पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहेत.
या दोन कॅपिटल सिटी केवळ राजधानी म्हणूनच नाही तर एक औद्योगिक शहर म्हणून आणि दुसरे आयटी हब म्हणून संपूर्ण जगात ओळखले जातात. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. विद्यार्थी, उद्योजक, कामगार रोजच या दोन्ही शहरांदरम्यान अपडाऊन करतात.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; ‘हा’ बहुचर्चित मार्ग वाहतुकीसाठी खुला, पण…..
दरम्यान आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. यां मार्गांवर दोन बोगद्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील एक बोगदा 1.75 किमी लांबीचा आहे, तर दुसरा 8.93 किमी लांबीचा बोगदा विकसित केला जात आहे. आता या बोगद्याचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले असल्याचे काही प्रतिष्ठित रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
वास्तविक या बोगद्यांचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी खुले होतील असं सांगितलं जात होतं मात्र आता हे काम जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले आहे. म्हणजे या प्रकल्पाच्या कामाला आता उशीर होणार असल्याचे चित्र आहे.
हे पण वाचा :- अवकाळी पाऊस केव्हा घेणार विश्रांती ! पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती, पहा काय म्हटले Punjabrao?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हे दोन्ही बोगदे लोणावळ्यातील तलावाखालून तयार केले जात आहेत. या बोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाले अन वाहतुकीसाठी खुले झाले तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. म्हणजेच मुंबई ते पुणे या प्रवासातील जवळपास 30 मिनिटे वाचणार आहेत.
यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर 19 किमीवरून 13.3 किमी इतके कमी होणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. खरं पाहता हा प्रकल्प मिसिंग लिंक प्रोजेक्ट म्हणून ओळखला जात असून आता हा मिसिंग लिंक प्रकल्प जानेवारी 2025 मध्ये प्रवाशांसाठी खुला होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या बोगद्याची रुंदी ही 23 मीटर आहे म्हणजेच हा जगातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. निश्चितच, या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पामुळे दिलासा मिळणार आहे.