Mumbai News : देशभरात सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेसाठी गेम चेंजर सिद्ध होत आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलत आहे. याचा प्रवाशांना देखील मोठा लाभ मिळत आहे. वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर इतर एक्सप्रेसच्या तुलनेत किंचित अधिक आहेत मात्र इतर एक्सप्रेसच्या तुलनेत प्रवास अधिक गतिमान आणि सोयीसुविधा अधिक असल्याने या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून पसंती दिली जात आहे.
अशातच आता राजधानी मुंबईसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईमध्ये लवकरच वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास मोठा गतिमान होणार आहे. याबाबत फ्री प्रेस जनरल ने एक सविस्तर वृत्त दिल आहे.
हे पण वाचा :- पहिल्यांदा होम लोन घेताय का? मग ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा फायद्यात राहाल
त्यानुसार, वंदे लोकल ही वंदे भारतची आणखी एक लोकप्रिय छोटी आवृत्ती राहणार आहे. यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास मिळेल आणि आरामदायी प्रवासासाठी मदत होईल. खरं पाहता मुंबई महानगर प्रदेशात ऑलरेडी सुरू असलेल्या एसी लोकलला प्रवाशांची चांगली पसंती लाभत आहे. यामुळे वंदे लोकल देखील सुरू होणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शुक्रवारी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी मोठी माहिती दिली आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनिश गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे बोर्ड मुंबईमध्ये वंदे लोकल सुरू करण्याची शक्यता तपासत आहे. या वंदे लोकल गाड्या सुरू करण्याच्या शक्यताचा विचार रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून केला जात आहे. विशेष बाब म्हणजे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फेब्रुवारीमध्ये वंदे मेट्रो बाबत मोठी माहिती दिली होती. देशात संपूर्ण भारतीय बनावटीचे वंदे मेट्रो लवकरच धावणार असं त्यांनी नमूद केलं होतं.
हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ झाली फिक्स; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार निर्णय
अशातच आता रेल्वे बोर्ड कडून मुंबईमध्ये वंदे लोकल सुरू करण्याची शक्यता पाहता वंदे भारत ट्रेनचा विस्तार मोठ्या स्तरावर केला जाणार असल्याचे चित्र आहे. निश्चितच मुंबईमध्ये वंदे लोकल सुरू झाली तर मुंबईमधील लोकल मार्गे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना,स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी खुशखबर ! अहमदनगर महापालिकेमध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली भरती; आजच करा अर्ज