Mumbai News : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे शहर वासियांची वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी सुटका झाली आहे. मात्र अजूनही शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही.
हेच कारण आहे की, अजूनही शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. नवीन रस्ते उड्डाणपूल मेट्रो यामुळे शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी आधीच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी झाली आहे.
या प्रकल्पांमुळे शहरातील प्रवास जलद झाला असून शहरात आणखी एक नवीन रस्ते मार्ग प्रकल्प तयार होणार आहे. खरेतर सध्या स्थितीला मुंबई, ठाण्याहून नवी मुंबईला, खारघर किंवा नवी मुंबई विमानतळाच्या दिशेनं जाण्यासाठी बराच वेळ लागत आहे.
यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. आता मात्र ही अडचण कायमची दूर होणार आहे. तुर्भे ते खारघर दरम्यान लिंक रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई, ठाण्याहून नवी मुंबई, खारघर किंवा नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास फक्त तीस मिनिटात पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पाची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार प्रकल्प
खारघर-तुर्भे लिंकरोड प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यास सक्षम राहणार आहे. हा एक चौपदरी मार्ग राहणार असून याची लांबी साधारण 5.49 किमी असेल. यामध्ये 1.96 किमी लांबीचा बोगदा राहणार आहे. या प्रकल्पाचे काम करण्यासाठी नुकतीच निविदा प्रक्रिया राबवली केली होती.
यात ऋत्विक प्रोजेक्ट्स व एव्हरास्कॅन (जेव्ही) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन पूर्ण झाले आहे. खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरुळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्योगिक वसाहत यांना जोडणाऱ्या या लिंक रोड प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूर्ण झाले आहे.
5.49 किमीचा खारघर-तुर्भे लिंक रोडचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले असल्याने या प्रकल्पाचे काम आता सुरू होईल आणि नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकल्पांतर्गत तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डोंगराखालील 1.76 किमीच्या बोगद्याचे देखील काम केले जाणार आहे.
हा संपूर्ण प्रकल्प चार वर्षात पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पासाठी तीन 3.166 कोटी रुपये खर्च होणार अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय, घणसोली-ऐरोली दरम्यान सहा पदरी खाडीपुलाचेही काम केले जाणार आहे.
दरम्यान हा देखील प्रकल्प झाला तर ठाणे ते बेलापूर हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. सध्या ठाणे ते बेलापूर अंतर कापण्यासाठी 16 मिनिटांचा वेळ लागतोय, मात्र हे अंतर या प्रकल्पामुळे फक्त पाच मिनिटात कापले जाऊ शकणार आहे.