Mumbai News : मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करणासाठी एमएमआरडीए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जोमात प्रयत्न सुरू आहेत. प्राधिकरण वेगवेगळे रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सध्या स्थितीला करत आहे. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. एवढेच नाही तर मुंबई ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जलद कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ते पुणे एक्सप्रेस वे पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉर देखील विकसित केला जाणार आहे.
दरम्यान आता या कॉरिडॉर बाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या कॉरिडॉरचा खर्च हा तब्बल 473 कोटी रुपयांनी वधारला आहे. विशेष बाब म्हणजे या वाढीव खर्चाला एमएमआरडीएच्या माध्यमातून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे या कॉरिडॉरचा प्रश्न निकाली लागला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एम एम आर डी ए ची 154 वी बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते. बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते आणि याच बैठकीत एमएमआरडीएने मुंबई ट्रांस हार्बर लिंक ते पुणे एक्सप्रेस वे पर्यंत उभारल्या जाणाऱ्या एलिवेटेड कॉरिडॉरसाठी वाढीव खर्चाला मान्यता दिली आहे. यामुळे आता मुंबईकरांचा पुण्याकडील प्रवास आणखीनच सुसाट होण्यास मदत होणार असल्याचा दावा जाणकार लोकांच्या माध्यमातून केला जात आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘हा’ चर्चित अन अतिमहत्वाचा मेट्रो मार्ग ‘या’ तारखेला होणार सुरु, पहा डिटेल्स
एमटीएचएल ते पुणे एक्सप्रेस वे पर्यंत एलिवेटेड कॉरिडोर ची गरज काय?
जसं की आपणास ठाऊकच आहे की, मुंबईला नवी मुंबईची जोडण्यासाठी एमटीएचएल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्प अंतर्गत 22 किलोमीटर लांबीचा समुद्री मार्ग विकसित होणार आहे. या 22 किलोमीटर पैकी 18 किलोमीटरचा मार्ग हा समुद्रावरून आहे. या समुद्री मार्गामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अर्धा तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.
मात्र, मुंबईमधील प्रवाशांना थेट मुंबई पुणे एक्सप्रेस वेला कनेक्टिव्हिटी मिळावी आणि पुण्याकडील प्रवास प्रवाशांचा सोयीचा व्हावा या दृष्टीने एमटीएचएल ते पुणे एक्सप्रेस वे पर्यंत एलिव्हेटेड कॉरिडोर तयार करण्याचे नियोजन एम एम आर डी ए च्या माध्यमातून आखण्यात आले आहे. या एलिवेटेड कॉरिडॉर प्रकल्प अंतर्गत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे गाठण्यासाठी चिर्ले ते गव्हाणपाडा साडे चार किमी लांबीची उन्नत मार्गिका व पुढे एक्स्प्रेस वे जवळील पळस्पे ते एक्स्प्रेस वेदरम्यान 2 किमी लांबीची उन्नत मार्गिका विकसित केली जाणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वर्सोवा विरार सीलिंक आता ‘या’ शहरापर्यंत वाढवला जाणार, पहा संपूर्ण डिटेल्स
या कॉरिडोर साठी सुरुवातीला 947 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या खर्चात वाढ झाली असून सुधारित 1420 कोटी रुपयांच्या खर्चाला आता मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान प्रकल्पामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल झाला असल्याने खर्च वाढला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी भूसंपादन देखील करावे लागणार असल्याने खर्चात वाढ झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली असून ही निविदा 5 मे रोजी उघडली जाईल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. निश्चितच हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अति महत्त्वाचा असून यामुळे मुंबई वासियांना पुणे एक्सप्रेस वे पर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. यामुळे मुंबईमधील वाहतूक व्यवस्था अजूनच सक्षम होईल आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचेल असा आशावाद व्यक्त होत आहे.