Mumbai News : राजधानी मुंबईला स्वप्ननगरी आणि मायानगरी म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. अशा या स्वप्ननगरीत मात्र हक्काचे घर करणे म्हणजे आता स्वप्नच झालं आहे. घरांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. म्हणून येथे कामानिमित्त स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना अजून देखील भाड्याच्या घरातच आपलं आयुष्य कटवाव लागत आहे.
दरम्यान मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर करू पाहणाऱ्या नागरिकांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आज आम्ही विशेष आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. यामुळे अनेक लोकांचे मुंबईमध्ये घर बनवण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; तब्बल ‘इतके’ दिवस ‘या’ लोकल ट्रेनच्या फेऱ्या राहणार बंद, पहा यादी
खरं पाहता मुंबईमध्ये आणि मुंबईसारख्याच मेट्रो शहरामध्ये जसे की, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नासिक, अमरावती यांसारख्या महानगरात घरांच्या किमती प्रचंड वाढल्या असल्याने सर्वसामान्य म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. अशातच आता म्हाडाने एक गुड न्यूज दिली आहे. मुंबईमध्ये व मुंबईजवळ फक्त 17 लाखात म्हाडाकडून घर मिळणार आहे. नवी मुंबईमध्ये हे घरे उपलब्ध आहेत.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार मात्र 17 लाखात म्हाडा कडून 1 बीएचकेचे घर या ठिकाणी मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही घरे म्हाडा कोकण लॉटरी अंतर्गत गुडविल युनीटी सानपाडा नवी मुंबई प्रकल्पात आहेत. या ठिकाणी उपलब्ध असलेली घर ही अल्प उत्पन्न गटासाठी असून इच्छुक नागरिकांना लवकरात लवकर अनामत रकमेसह आपला अर्ज म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सादर करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- वावर है तो पावर है ! सोलापूरच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी लिंबूच्या शेतीतून मिळवले एकरी 10 लाखांचे उत्पन्न, वाचा ही यशोगाथा
यासाठी वीस हजार 590 रुपये अनामत रक्कम असल्याची माहिती देण्यात आली आहे. एवढेच नाही तर म्हाडा कोकण मंडळ लवकरच आणखी काही घरांसाठी लॉटरी जारी करणार आहे. पुढल्या घर सोडतीमध्ये ठाणे, वसई, विरार, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्ये घरी उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लवकरच मुंबई मंडळ अंतर्गत देखील घर सोडत जारी होणार आहे.
गोरेगाव पहाडी भागात पुढल्या लॉटरीमध्ये मुंबई मंडळाकडून घर उपलब्ध होणार आहेत. निश्चितच मुंबई मंडळ अंतर्गत गोरेगाव पहाडी भागात जी घर असतील त्या घरांच्या किमती सहाजिकच कोकण मंडळापेक्षा अधिक राहणार आहेत. मात्र कोकण मंडळांने सानपाडा आणि घणसोली या विभागात 17 लाख ते 24 लाख पर्यंत वन बीएचके आणि टू बीएचके घर उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे इच्छुकांनी त्वरित या संधीचा फायदा घेतला पाहिजे.