Mumbai News : मुंबई व उपनगरात गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चाकरमान्यांची वाढणारी संख्या, तसेच रोजाना पर्यटकांमध्ये होणारी वृद्धी यामुळे मुंबई व महानगरक्षेत्रात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढू लागली आहे.
अशा परिस्थितीत मुंबई व उपनगरातील ही ट्रॅफिक ची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शहरात आणि उपनगरात मेट्रोचे देखील काम सुरू आहे. मेट्रोचे जाळे विकसित करण्यासाठी मुंबई महानगर प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.
हे पण वाचा :- ब्रेकिंग! पुणे रिंगरोडबाबत महत्वाची बातमी; ‘या’ एका कारणामुळे आता भू-संपादन रखडणार
दरम्यान आता शहरातील मेट्रो मार्गांच्या कामांना गती देण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून एम एम आर डी ए अर्थातच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे मुंबई मेट्रो पॉलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला सात मेट्रो मार्गांच्या कामांसाठी डबल 166 कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले आहे.
मंगळवारी हे कर्ज वितरित करण्यात आले असून आता या मेट्रो मार्गांच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान आज आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून 166 कोटी रुपयांचे बिनव्याची कर्ज नेमक्या कोणत्या सात मेट्रो मार्गांसाठी वितरित करण्यात आले आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- म्हाडा कोकण मंडळ सोडतबाबत महत्वाची बातमी; समोर आली ‘ही’ मोठी आकडेवारी, पहा….
या सात मार्गांचे काम होणार आता सुपरफास्ट
- आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नगर विकास विभागाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या कर्जातून मेट्रो मार्ग क्रमांक 2 A अर्थात दहिसर डीएननगर हे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी 30 कोटी रुपये कर्ज मंजूर आहे
- डीएननगर-मंडाळेसाठी 20 कोटी
- मेट्रो मार्ग क्रमांक 4 अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवलीसाठी ३२ कोटी
- मेट्रो ५ अर्थात ठाणे-भिवंडी-कल्याणसाठी १४ कोटी,
- मेट्रो क्रमांक ६ अर्थात स्वामी समर्थनगर-जोगेश्वरी-विक्रोळीसाठी १८ कोटी
- मेट्रो मार्ग क्रमांक ६ अंधेरी- दहिसरसाठी ३८ कोटी
- मेट्रो मार्ग क्रमांक ९ दहिसर – मीरा-भाईंदरसाठी १४ कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे.
- म्हणजेच आता या मेट्रो मार्गांच्या कामाला मोठी गती मिळणार असून ही मार्गे लवकरात लवकर तयार होण्यास मदत होणार आहे. निश्चितच यामुळे मुंबई शहरात सुरू असलेल्या मेट्रो कामांना बूस्टर मिळणार यात तीळमात्र देखील शंका नाही.
हे पण वाचा :- मोठी बातमी! 12व्या वंदे भारत ट्रेनची घोषणा; देशातील ‘या’ दोन प्रमुख शहरादरम्यान धावणार, 8 एप्रिलला होणार लोकार्पण