Mumbai News : मुंबई आणि उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक मुंबईसह संपूर्ण राज्यभरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. मुंबईमध्ये देखील रस्त्यांची कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत.
काही रखडलेली कामे देखील आता पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्याचे नियोजन संबंधित प्राधिकरणाकडून आखले जात आहे. मुंबईमध्ये नवीन फ्लाय ओव्हर, भुयारी मार्ग, कोस्टल रोड, खाडी पूल, यांसारखे इत्यादी कामे प्रस्तावित आहेत. दरम्यान आता ओशिवरा-जोगेश्वरी पूर्व उड्डाणपुलाचा विस्तार करण्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! आज 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस लाँच होणार; कोणत्या रूटवर धावणार, कसं असणार वेळापत्रक? पहा….
या पुलाच्या विस्तारीकरणाचे काम मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ऑथॉरिटीच्या माध्यमातून केले जाणार असून याला तीन वर्षे लागणार आहेत. या विस्तारीकरणाच्या माध्यमातून जोगेश्वरी येथील पूनम नगर-जेव्हीएलआर ते अंधेरीचा लिंक रोड जोडला जाणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे. यासाठी जवळपास 346.16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हे काम सुरू करण्यापूर्वी आता गहाळ दुवे बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जोगेश्वरी पूर्व येथे ६२० मीटर, तर ओशिवराच्या दिशेने सुमारे ५५० मीटर रॅम्प आणि रोड यासाठी बांधणे गरजेचे आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे या ठिकाणी सुद्धा केबल स्टेड ब्रिज बांधण्यात येणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा केबल स्टेड ब्रिज पश्चिम द्रुतगती महामार्गाला म्हणजे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला ओलांडणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजी नगर मध्ये घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! म्हाडा बांधणार ‘इतके’ घरे
वास्तविक, २०१५ मध्ये जोगेश्वरी-ओशिवरा आणि जेव्हीएलआर हा भाग जोडण्यासाठी या फ्लायओव्हरच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आली होती. या कामाची सुरुवात झाल्यानंतर लवकरच हे काम पूर्ण होईल आणि येथील वाहतूक व्यवस्था पूर्वीच्या तुलनेत आणखीनच सुलभ होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता.
मात्र कामाची सुरुवात झाल्यानंतर दहिसर-अंधेरी मेट्रोचे काम सुरु करण्यात आले. यामुळे या पुलाचे काम रखडले गेले. परिणामी आता हा केबल स्टेट ब्रिज केव्हा पूर्ण होईल, याचे काम पुन्हा सुरू होणार का? यांसारखे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा या ब्रिजचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे.
हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांसाठी खुशखबर ! Mumbai-Pune Missing Link प्रकल्प ‘या’ दिवशी होणार सुरु; वाचा सविस्तर
त्यामुळे हे रखललेले काम आता जलद गतीने पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. या केबल स्टेड ब्रिजमुळे जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोड ते ओशिवरा किंवा महामार्गापर्यंत जाण्यासाठी अवघ्या 10 मिनिटांचा वेळ लागेल अशी माहिती दिली जात आहे. निश्चितच या केबल स्टेट ब्रिजमुळे प्रवासाचा कालावधी वाचणार आहे.
यामुळे प्रवाशांच्या वेळेत तर बचत होईलच शिवाय वाहतूक कोंडी होणार नाही आणि होणारे अपघात देखील कमी होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. एकंदरीत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले हे काम आता लवकरच पूर्ण होईल आणि येथील प्रवाशांना दिलासा मिळेल असा विश्वास जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे.