Mumbai News : मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या जटिल रुप घेऊ लागली आहे. विशेषतः मुंबई ते ठाणे दरम्यान प्रवास करतांना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. मुंबई ते ठाणे प्रवास करताना छेडानगर जंक्शन या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. हेच कारण आहे की छडा नगर जंक्शन सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण तीन उड्डाण पूल आणि एक सबवे बांधला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत दोन पुलांचे काम पूर्ण झाले असून प्रवाशांसाठी हे दोन्ही पूल सूरु झाले आहेत. यापैकी एका पुलाचे उद्घाटन काल म्हणजे 13 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.
तर एक उड्डाणं पूल गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. काल मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असून आता मुंबई ते ठाणे म्हणजेच मानखुर्द ते ठाणे हा प्रवास सुसाट होणार आहे. यामुळे आता मुंबईकरांना ठाणे गाठण्यासाठी आणि ठाणेकरांना मुंबई गाठण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा आहे हा उड्डाणंपुल
नुकताच प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला मानखुर्द ते ठाणे दरम्यान चा उड्डाणपूल एकूण 1.23 किलोमीटर लांबीचा आहे. हा दोन पदरी उड्डाणं पूल असून याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे मुंबई ते ठाणे प्रवास गतिमान झाला आहे.
यामुळे मानखुर्द वरून ठाणे कडे जाणारी वाहने सिग्नल फ्री धावणार आहेत. या पूलमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे तसेच नवीमुंबई वरून येणारी वाहने आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.
हे पण वाचा :- पुणेकरांनो ऐकलंत व्हयं ! ‘या’ दिवशी ‘त्या’ महत्वाच्या भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद; कारण काय? पहा….
छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्पाची गरज नेमकी का?
सांताक्रुज चेंबूर जोड रस्ता आणि पूर्वद्रुतगतीमार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरांतील तसेच नवी मुंबई वरून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीमुळे घाटकोपर मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. घाटकोपर येथील छेडा नगर जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ही वाहतूक कोंडी फोडण्याचा निर्णय झाला. यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एम एम आर डी ए मार्फत छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले.
या छेडा नगर जंक्शन सुधारणा प्रकल्प अंतर्गत एकूण तीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग म्हणजे सब वे बांधला जात आहे. दरम्यान आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या तीन उड्डाणपूलांपैकी दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी एकूण २२३.८५ कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पातील सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्याला जोडणाऱ्या उड्डाणपूल हा गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. आणि काल मानखुर्द ते ठाणे दरम्यान असलेला उड्डाणपूल देखील प्रवाशांसाठी खुला झाला आहे.