Mumbai News : या चालू वर्षात देशातील एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. नुकत्याच तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार देखील पडल्या आहेत. विशेष म्हणजे पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत.
आगामी निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता शासनाच्या माध्यमातून देशातील वेगवेगळ्या प्रमुख रूटवर वंदे भारत ट्रेन देखील जलद गतीने सुरू करण्याचा मानस आहे. नुकतेच गेल्या महिन्यात महाराष्ट्राला दोन वंदे फार ट्रेन लाभल्या आहेत. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी यादरम्यान या ट्रेन सध्या धावत आहेत. अशातच आता महाराष्ट्राला अजून एक मोठी भेट मिळणार आहे ती म्हणजे मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू केली जाणार आहे.
या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच अपडेट केली आहे. दानवे यांनी एका भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळाला या संदर्भात माहिती दिली आहे. दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गोवा रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि त्यानंतर या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू होईल असं दानवे यांनी सांगितलं आहे.
हे पण वाचा :- तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ एसटी आगारात विविध पदांसाठी भरती सुरू; 15 मार्चपर्यंत अर्ज करता येणार, इतकं मिळणार वेतन
या रूटवर सुरू होणारी वंदे भारत ट्रेन मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस आणि मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवरच धावणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच, दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे जर लवकरच मुंबई ते गोवा दरम्यान ही सुपरफास्ट ट्रेन धावली तर महाराष्ट्र हे एकमात्र राज्य बनेल ज्या ठिकाणी पाच वंदे भारत ट्रेन धावतील. यासोबतच या ट्रेनमुळे मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा देखील मोठा फायदा होणार आहे.
वास्तविक गोवा हे मोठे पर्यटन स्थळ आहे, तसेच राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी शिवाय मुंबई देखील एक मोठा पर्यटन स्थळ आणि व्यापारी शहर आहे. यामुळे या दोन्ही शहरांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावल्याने प्रवाशांचा वेळ वाचेल. यामुळे उद्योग जगताला सर्वाधिक फायदा होणार आहे. या ट्रेनचा कोकणवासीयांना देखील फायदा होईल. पर्यटकांना देखील मुंबई आणि गोवा ही डेस्टिनेशन जवळ होतील.
निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील ही ट्रेन महत्त्वाची आहे आणि गोव्याच्या दृष्टीने देखील ही ट्रेन महत्त्वाचीच राहणार आहे. अद्याप मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन केव्हा धावेल याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये ही ट्रेन कोणत्या रूटवर धावेत याबाबत एक अंदाज बांधला गेला आहे.
हे पण वाचा :- होळीच्या सणाला ‘या’ बँकेने दिली गोड बातमी; गृहकर्जावरील व्याजदरात केली मोठी कपात, आता घर घेणं होणार सोपं
असा राहू शकतो रूट?
वास्तविक सध्या मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासासाठी आठ तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. मुंबई ते गोवा दरम्यान एक छोटा मार्ग आहे जो 412 किलोमीटरचा आहे त्यावर जर ही अपकमिंग वंदे भारत ट्रेन धावली तर तीन ते चार तासात मुंबई ते गोव्याचा प्रवास शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. रेल्वे मार्गाबाबत अद्याप खुलासा झालेला नाही मात्र या रूटवर धावली तर तीन ते चार तासात मुंबई ते गोवा प्रवास शक्य होईल असं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेजस सुपरफास्ट ट्रेन च्या मार्गे गोव्यात जाते त्याच मार्गावर वंदे भारत ट्रेन देखील गोव्यात जाणार आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन तेजस ट्रेन सुटते आणि ठाणे, रत्नागिरी, करमाळी मार्गे मडगावपर्यंत जाते. मात्र ही तेजस ट्रेन सीएसएमटी ते मडगाव पर्यंत जवळपास सहा ठिकाणी थांबते. वंदे भारत एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे त्यामुळे या ट्रेनला थांबे कमी राहण्याची शक्यता आहे.